Vijay Wadettiwar,  Eknath Shinde
Vijay Wadettiwar, Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde on Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना झोडपले..

Maharashtra Politics : राज्याला चांगला विरोधीपक्षनेता लाभला
Published on

Mumbai News : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर कॉंग्रेसच्या विजय वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी वडेट्टीवारांच्या धडाडीचे कौतुक केले. वडेट्टीवारांच्या अभिनंदनातूनही शिंदेनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना डिवचण्याची संधी सोडली नाही.

"रस्त्यावर उतरायचे असते, त्यासाठी हिमत लागले, संकटात लपायचे नसते," अशा बोचऱ्या शब्दांत शिंदेंंनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंना टोले हाणले. खूर्ची जाऊन एक वर्ष झाले तरी काही जण नैराश्येतून बाहेर पडले नाहीत, असा टोमणा त्यांनी ठाकरेंना लगावला. विधानसभेत वडेट्टीवारांच स्वागत सोहळा अन दुसरीकडे शिंदेनी ठाकरेंना झोडपल्याची चर्चा रंगली.

Vijay Wadettiwar,  Eknath Shinde
Shivsena 16 Mla Disqualification : सोळा आमदार अपात्रतेची सुनावणी कधी ? सुप्रीम कोर्टानं दीड महिना...

विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांनी निवड झाली. त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी त्यांचे स्वागग केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी वडेट्टीवार यांचे स्वागत करताना सभागृहात टोलेबाजी केली.

"काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिल्यांच दिवशी त्यांची करायला हवी होती, आता अधिवेशनाला दोन दिवस बाकी असताना त्यांची निवड झाली, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचे वाटते. वडेट्टीवार हे मुळचे शिवसैनिक आहेत. विरोधीपक्ष नेतेपदाला ते न्याय देतील," अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

"विरोधीपक्षनेता पॉवरफूल असावा लागतो. राज्याला चांगला विरोधीपक्षनेता लाभला आहे, मी त्यांना शुभेच्छा देताना काही जण घाबरले. वडेट्टीवार हे वर्कफॉम होम करणारे नेते नाही, असे सांगत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला.

"विरोधीपक्षनेता हा भावी मुख्यमंत्री असतो. काल जे विरोधीपक्षनेते होते ते मुख्यमंत्री झाले आहेत . राज्याला अजित पवार यांच्यासारखे विरोधीपक्ष नेते लाभले आहेत, असे शिंदे म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com