CM Shinde News : 'बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण काही लोक घरगडी समजतात'; एकनाथ शिंदेंचा टोला!

Eknath Shinde News : राजकारणात इकडे तिकडे बघायचं नाही आपलं काम करायचं, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
CM Shinde
CM ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : 'बाळासाहेबांच्या शिवसेनेला वाचविण्यासाठी धाडस करून पाऊल उचलले. चूकीचे पाऊल उचलले असते तर इतके लोक सोबत आले नसते. तसेच मुख्यमंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता आजही जिवंत ठेवला आहे आणि उद्याही मी कार्यकर्ता राहणार आहे. असे सांगत प्रत्येक युवा सैनिक हा मुख्यमंत्री आहे.' असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यातील युवा सेनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात केले.

ठाण्याच्या रेमंड मैदानात युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि चित्रकार शशिकांत धोत्रे यांना शिवगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Shinde
Maratha Reservation News : 'रास्ता रोको' पूर्वीच ठाण्यात मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात!

'बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक घरगडी समजतात. परंतु आता पक्षाचा कोणीही मालक नाही आणि नोकरही नाही. सर्व जण कार्यकर्ते आहेत. कोणी मोठा आणि छोटा नाही. शिवसेना पुढे न्यायची आहे.' असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभर शिवसेना शाखांचे जाळे विणले. या शाखा लोकांना न्यायमंदिर वाटेल असे आपण काम करायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

याशिवाय 'सध्या राजकारणात कबड्डी सुरू आहे. एक दुसऱ्याचे पाय ओढायचं काम सुरू असतं. पण आपण मात्र आपलं काम करत असतो. इकडे तिकडे बघायचं नाही आपलं काम करायचं.' असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

तर, आपले खेळाडू सध्या मैदान देखील गाजवत आहेत आणि म्हणून आपल्या मातीतला खेळ जगभर पोहोचवण्यासाठी अशा स्पर्धांचा मोठा हातभार लागणार आहे आणि म्हणून राज्यातील खेळाडूंना वाव मिळण्यासाठी त्यांच्यातील गुणवत्ता, क्षमतेला महत्व देणे महत्वाचं असल्याचे ही ते म्हणाले.

CM Shinde
Shiv Sena News : मुख्यमंत्रीपदाची खुर्ची न दिल्यानेच ठाकरेंनी विचारधारा बदलली; देवरांचा घणाघात

ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेज येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) सन 2023-24, या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.

याप्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव सुनिल हांजे, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के,महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे,मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com