Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात माजी नगरसेवकांचा 'दिवा'; रस्ते धुऊन दिवेकरांच्या जखमेवर मीठ

Diva Problem and Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनी लक्ष देऊन दिवेकरांची पाणीटंचाई दूर करण्याची अपेक्षा
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात माजी नगरसेवकांचा 'दिवा'; रस्ते धुऊन दिवेकरांच्या जखमेवर मीठ
Published on
Updated on

Thane Political News : दिव्यातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. तेथील टँकर लॉबीमुळे दहा वर्षांपासून पाणी समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच दिव्यात शिंदे गटाचे सात माजी नगरसेवक आहेत, तर दिवा हा मुख्यमंत्री सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. दिव्यातील पाणीटंचाई कृत्रिम असून, ती सोडवण्याऐवजी शिंदे गटाचे दोन माजी नगरसेवक चक्क रस्तेच धुताना दिसून आले. शैलेश पाटील आणि दर्शना म्हात्रे यांनी शनिवारी महापालिका प्रशासनासोबत रस्ते धुतले. हे पाणी पिण्याचे नसले तरी, रस्ते धुऊन त्यांनी दिवेकरांच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका होऊ लागली आहे.

दिव्याखाली अंधार अशी एक म्हण प्रचलित आहे. तसा अंधार दिवा या शहरात विविध समस्यांनी पसरला आहे. त्यामधील सर्वांच्या जिवाचा प्रश्न असलेली पाणी ही समस्या. एकीकडे मुख्य जलवाहिनीचे उद्घाटन झाले, तर दुसरीकडे आणखी एका जलवाहिनीचे भूमिपूजन झाले. पण, दिवेकरांच्या नळाला पाणीच येत नाही. यासाठी योग्य नियोजन नाही. पाणी येत नसलेल्या पाण्याचे बिल भरायचे, त्यातच टँकर लॉबीकडून पाणी विकत घ्यायचे, अशी अवस्था दिवेकरांवर ओढवली आहे. मात्र, या समस्येकडे नेतेमंडळी आणि महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात माजी नगरसेवकांचा 'दिवा'; रस्ते धुऊन दिवेकरांच्या जखमेवर मीठ
Shivsena Kolhapur Maha Adhiveshan: ...अन् ढाण्या वाघाचं काळीज असलेल्या शिवसैनिकांचे डोळेही पाणावले!

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरू आहे. ही मोहीम शनिवारी दिवा प्रभाग समिती क्षेत्रात राबवण्यात आली. त्यावेळी मुख्य रस्त्यांची सफाई करण्यासाठी पाण्याचा वापर केला. त्यावेळी पाण्याचा प्रेशर पाहून नागरिकांचाही पारा चढला. याच प्रेशरने घरातील नाळाला पाणी कधी येणार, असा प्रश्न दिवेकरांनी उपस्थित केला आहे. या पाणीटंचाईकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) लक्ष देऊन सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा नागिरकांनी व्यक्त केली आहे. अन्यथा हा मुद्दा आगामी लोकसभा, विधानसभेसह महापालिका निवडणुकीत पेटण्याची शक्यता आहे.

ही मोहीम महापालिका (Thane Corporation) आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू आहे. यात रस्ते साफ करणे, पाण्याने धुणे, पदपथ सफाई, रस्ते दुभाजक स्वच्छ करणे, नाले सफाई, उद्यान सफाई आदी उपक्रम हाती घेतले आहेत.

मोहिमेत माजी नगरसेवक शैलेश पाटील, दर्शना म्हात्रे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, तुषार पवार, मनीष जोशी, उपनगर अभियंता विकास ढोले, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे, सहायक आयुक्त अक्षय गुडदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

(Edited by Sunil Dhumal)

R

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात माजी नगरसेवकांचा 'दिवा'; रस्ते धुऊन दिवेकरांच्या जखमेवर मीठ
Rohit Pawar : 10 वाजून 10 मिनिटे नाही, तर...; रोहित पवारांनी सांगितली अजितदादांच्या 'घड्याळाची नवी वेळ'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com