Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भूमिका घेणे सुरू केले आहे. आता मूळ पक्ष आणि घड्याळ हे चिन्हसुद्धा अजित पवारांना मिळाले आहे. यावर त्यांनी 'घड्याळ तेच वेळ नवी', असे म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघात माझ्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहनही केले. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
अजितदादांच्या घड्याळ तेच वेळ नवी, या घोषणेवर रोहित पवारांनी (Rohit Pawar) खोचक टोला लगावला आहे. रोहित पवार म्हणाले, आपल्या जुन्हा घड्याळाची वेळ दहा वाजून दहा मिनिटे होती. आता ते म्हणतात घड्याळ तेच पण वेळ नवी. त्यांच्या घड्याळाची वेळ आहे 4 वाजून 20 मिनिटे. कारण ते 420 आहेत. रोहित पवार असे म्हणताच सभास्थळी एकच हशा पिकला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, अजित पवारांवर (Ajit Pawar) विरोधकांकडून पक्ष चोरल्याचा आरोप होत आहे. यावर मी पक्ष चोरला नसून मला तो रितसर मिळाला आहे, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. यानंतरही रोहित पवारांनी अजित पवारांच्या पक्षाचा 420 असा उल्लेख केला आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. याला अजित पवार काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे.
बारामती येथे बोलताना अजित पवारांनी घड्याळ तेच वेळ नवी, असे म्हणत खासदार (Supriya Sule) सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार देण्याचे स्पष्ट केले आहे. सेल्फी काढून, संसदेत भाषणे करून कामे होत नसतात, अशी सुळेंवर टीका केली. तसेच मी दिलेल्या उमेदवार पूर्वीच्या खासदारांपेक्षा जास्त कामे करेल, असा दावाही अजित पवारांनी केला. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशा नणंद-भावजय रिंगणात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.