Kalyan Malanggad : मलंगगडाच्या पायथ्याशी हिंदुत्वाचा जागर

Eknath Shinde Shrikant Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांची मलंगगड संदर्भात मोठी घोषणा
Eknath Shinde, Shrikant Shinde
Eknath Shinde, Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

भाग्यश्री प्रधान-आचार्य :

Thane, Kalyan News : हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने कल्याणमधील मलंगगडच्या पायथ्याशी हिंदुत्वाचा गजर पाहायला मिळतोय. हरिनाम सप्ताहासाठीच्या स्टेजमध्ये एका बाजूला राम मंदिराची प्रतिकृती तर एका बाजूला मलंगगड आणि मच्छिंद्रनाथांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. या हरिनाम सप्ताहाचे स्वागताध्यक्ष खासrदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) असल्याने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महत्त्वाची घोषणा केल्यामुळे मलंगगडमुक्ती (Malanggad) होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Eknath Shinde, Shrikant Shinde
Lok Sabha Election : अखेर महायुतीचं ठरलं ! निवडणूक जिंकण्यासाठी...

कल्याणच्या ग्रामीण भागात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील वारकरी मंडळांनी मलंगगडाच्या पायथ्याशी राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या हरिनाम सप्ताहाचे उद्घाटन स्वागताध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि साधू-महंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

एकीकडे अयोध्येत भाजपकडून राम मंदिराचा प्रतिष्ठापनेच्या भव्य सोहळ्याचा प्रचार होताना दिसतोय. त्याचवेळी कायमच वादात असलेल्या मलंगडाच्या पायथ्याशी शिंदे गटाकडून हिंदुत्वाचा जयघोष केला गेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्र्यांची घोषणा, लवकरच मलंगगडमुक्ती...

एकीकडे भाजपने राम मंदिराचे स्वप्न पूर्ण केले त्याचप्रमाणे मलंगगड देखील वादातून मुक्त वाहवा अशा घोषणा येथील तरुण देत होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडमुक्तीचे काम लवकरच मार्गी लावू अशी घोषणा त्यांच्या भाषणात केली आहे.

राम मंदिराची प्रतिकृती...

मलंगगड पायथ्याशी उसाटणे गावात हरिनाम सप्ताह सुरू आहे. या व्यासपीठाच्या एका बाजूला राम मंदिराची प्रतिकृती सजवण्यात आला आहे तर एका बाजूला मलंगगड तसेच मच्छिंद्रनाथांचे छायाचित्र लावले आहे.

खासदार शिंदे 'रिंगणात'

साधू, संत आणि महंत हरिनाम सोहळ्याला उपस्थित होते. महाराजांच्या पालखीत जे घोडे नाचवले जातात तेच घोडे रिंगणात नाचवण्यात आले. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. खुद्द खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रिंगणात झेंडा नाचवला.

(Edited by Avinash Chandane)

Eknath Shinde, Shrikant Shinde
MLA Ravindra Chavan : आमदार रवींद्र चव्हाणांची मुख्यमंत्र्यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला दांडी, चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com