MLA Ravindra Chavan : आमदार रवींद्र चव्हाणांची मुख्यमंत्र्यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला दांडी, चर्चांना उधाण

MP Shrikant Shinde and MLA Ravindra Chavan Problems : खासदार श्रीकांत शिंदे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यात धुसफुस सुरू
shrikant Shinde Ravindra Chavan
shrikant Shinde Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

भाग्यश्री प्रधान

Kalyan Dombivli News : मलंगगडाच्या पायथ्याशी राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हजारो संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत. अनेक नेत्यांनीदेखील यासाठी उपस्थिती लावली आहे. मात्र डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती न लावल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

या कार्यक्रमाला चव्हाण अनुपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये अनेक वेळा धुसफुस पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र चव्हाण अनुपस्थित आहेत का? अशी चर्चा आता रंगत आहे.

गेली दोन दशके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सलोख्याचे राजकारण केले. मात्र एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कुरघोड्यांमुळे सध्या ते अस्वस्थ होते. मंत्री असूनही शहराच्या महापालिकेत आपल्या आणि समर्थकांच्या विकासकामांच्या नस्तींवर चढणारी धूळ पाहून चव्हाणांची अस्वस्थता टोकाला पोहोचली होती. केंद्रात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचा ध्यास असला तरी कल्याणात डॉ. शिंदे यांच्यासाठी जीव झोकून काम करायची मात्र अजिबात इच्छा नाही, असा जाहीर सूर चव्हाणांचे समर्थकही लावताना दिसत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

shrikant Shinde Ravindra Chavan
Nashik Farmers Protest : प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली; आक्रमक शेतकऱ्यांचा थेट पंतप्रधान मोदींना इशारा

आगामी काळात कल्याण लोकसभेची जागा भाजप लढवणार, असा सूरही चव्हाण यांनी सुरुवातीच्या काळात आळविला होता. मात्र त्यानंतर विकासकामांसंदर्भातील काही निर्णय घेण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण एकत्र आले. त्यांनतर कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदेच लढवणार, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. असे असले तरी खासदार शिंदे स्वागताध्यक्ष असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने दिसून आली. या कार्यक्रमासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार जगन्नाथ पाटील, आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपस्थित राहणार का?

पुढील आठवड्यात सोमवारी (८ जानेवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. आमदार रवींद्र चव्हाण हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे फडणवीस ज्या दिवशी येतील त्यादिवशी चव्हाण या सोहळ्याला नक्कीच हजर असतील, असा विश्वास शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. तसेच मंगळवारी ते कामात व्यस्त असतील, म्हणूनच ते अनुपस्थित राहिले असतील, असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

Edited by: Chaitanya Machale

shrikant Shinde Ravindra Chavan
Maratha OBC Reservation Issue : 'आधी शूद्रत्व स्वीकारा, मगच आरक्षण मागा..!'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com