Eknath Shinde : "मोदींच्या हस्ते कामांचं उद्धाटन होऊ नये, असं काहींना वाटतं पण नियतीपुढे..." शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!

Narendra Modi : बाळासाहेब आणि मोदींजींचं नातं जिव्हाळ्याचं नातं होतं.
Narendra Modi : Eknath Shinde : "
Narendra Modi : Eknath Shinde : "Sarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News : आज मुंबईच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामं व लोकार्पणाचं कार्यक्रम होणार आहे. यानंतर आज मोदी बीकेसी मैदानात सभा घेणार आहेत. सभेच्या ठिकाणी आता भाजप कार्यकर्ते आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ठमुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्याचं काम आता होत आहे. मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसाची सुरूवात सुवर्ण अक्षराने लिहावी, अशी आहे. २०१५ मध्ये मोदींच्या हस्ते मेट्रो कार्यक्रमाचं भूमीपूजन झालं होतं. आता त्यांच्या हस्ते या सेवेचं लोकार्पण होत आहे. हा मोठा दैवी योग आहे. काही लोकांची अपेक्षा होती की , या कामाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होऊ नये. मात्र नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही. मात्र जनतेची अपेक्षा होती की या कामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते व्हावं. समृद्धी महामार्गाचं शुभारंभ ही मोदी यांच्या हस्ते झाला. "

"बाळासाहेब आणि मोदींजींचं नातं जिव्हाळ्याचं नातं होतं. हिंदुत्वचा विचार हा या दोघांमधाल समान धागा आहे. विकासाचं राजकारण हा पाया आहे, हेच सूत्र धरून प्रकल्पांचे उद्घाटन कतरण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रण दिले आहे. आपलं सरकार आल्यानंतर विकासाच्या कामांना चालना दिली," असे शिंदे म्हणाले.

Narendra Modi : Eknath Shinde : "
Pimpri-Chinchwad News: उमेदवारी वरुन चिंचवड भाजपात दोन गट; अश्विनी जगतापांना उमेदवारी मिळाली तरच काम करणार!

"विकासाला मानवी चेहरा मानून मुंबईकरांच्या आरोग्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करत आहोत, त्याचंही उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल. २० दवाखाने आज सुरू होत आहेत, लवकरच १२३ दवाखाने होतील. अनेक प्रश्न प्रलंबित होते. मात्र इच्छाशक्ती नव्हती. आपण आज हे काम पूर्णत्वाला नेतोय, असे शिंदे म्हणाले.

"विकासकामात खोडा घालण्याचं काम काही जण करतायेत, त्यांना त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करू, आपलं सरकार आल्यापसून डांबरीकरणाच्या नावाखाली काळं पांढरं करणाऱ्यांची दुकान बंद पडले आहेत. आपण करत असलेल्या विकासकामांमुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे,मळमळ उठत आहे. सहा महिन्यात हे सरकार एवढं काम करू शकतो, पुढील दोनम वर्षात काय होईल,याचा काहींना त्रास होतोय. त्यांच्या टिकेला उत्तर आम्ही कामाने देवू," असे शिंदे म्हणाले.

Narendra Modi : Eknath Shinde : "
Narendra Modi News : मोदींच्या आगमनापूर्वीच बीकेसीमधली कमान कोसळली!

"दावोसमध्ये मला अनेक लोक भेटले, विविध देशातले लोक भेटले, अनेक देशांचे प्रधानमंत्री होते. ते मोदींबद्दल विचारायचे. मला लक्झंबरचे प्रधानमंत्री भेटले. मला म्हणाले मी मोदींचा भक्त आहे. माझ्यासोबत फोटो काढले आणि म्हणाले हे मोदींना दाखवा. जर्मनीचे काही लोक भेटले, सौदीचे काही लोक भेटले म्हणाले, 'तुम्ही मोदींसोबत आहे ना," मी म्हणाले, मी मोदींच्या सोबत आहे. असं ही शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com