VIDEO : CM शिंदेंचं उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य अन् अजितदादा खळखळून हसले; फडणवीसांचीही टोलेबाजी...

Eknath Shinde News : अडीच वर्षांतील कामाचा लेखाजोखा मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी मांडला. यावेळी विरोधकांचा समाचारही मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला.
devendra fadnavis | eknath shinde | ajit pawar
devendra fadnavis | eknath shinde | ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महायुती सरकारनं अडीच वर्षांच्या कामाचं ‘रिपोर्ट कार्ड’ जनतेसमोर मांडलं. महायुती सरकारनं 60 ते 70 मंत्रिमंडळ बैठका घेतल्या. त्यातून तब्बल 900 निर्णय घेण्यात आले, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सर्वसामान्य माणूस ‘कॉमन मॅन’ नव्हे, तर ‘सुपरमॅन’ व्हायला पाहिजे, असं मतंही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं.

यावेळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि महायुती सरकारमधील कामांची तुलना करून तुफान फटकेबाजी केली. तेव्हा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खळखळून हसत होते. तर, उपमुख्यमंतरी देवेंद्र फडणवीस यांनीही अजितदादांना उद्देशून टोलेबाजी केली.

नेमकं घडलं काय?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ’, ‘लाडका शेतकरी’, ‘लाडका प्रवाशी’ या योजना जनेतनं स्वीकारल्या. याविरोधात जेवढं बोलाल तेवढं तुम्ही खड्ड्यात जाल, हे पण साधं विरोधकांना कळत नाही. आम्हाला राज्यासाठी काम करायचं आहे.”

devendra fadnavis | eknath shinde | ajit pawar
Ajit Pawar: पक्षातील ‘आउटगोइंग’वर प्रश्न, अजितदादा चिडले अन् हिंदीतून फाडफाड बोलून गेले

“मला, देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि अजितदादा यांना दिवसातून हजारो लोक भेटतात. पूर्वी वर्षा बंगल्यावर कोण जात होते? किती लोकांना वर्षा बंगल्याचे दरवाजे उघडे होते? याचा विचार जनता नक्की करते. जनताच म्हणतेय, हे चालतं-बोलतं सरकार आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून फक्त दोन ते तीन कोटी रूपये देण्यात आले होते. मात्र, आम्ही 350 कोटी रूपये दिले. हे जनतेचे पैसे आहेत. एखाद्याचा जीव वाचवला पाहिजे. कोणी आला की आम्ही लगेच सही करतो. तत्कालीन मुख्यमंत्री तर सही करायला पेनही काढत नव्हते,” असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना कोपरखळ्या लगावल्या.  

devendra fadnavis | eknath shinde | ajit pawar
Mahayuti Press Conference: महायुतीने मांडला अडीच वर्षांचा लेखाजोखा ; काय आहे रिपोर्ट कार्डमध्ये?

यावेळी अजितदादा खळखळून हसायला लागले. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “अजितदादा साक्षीदार होते.” तर, फडणवीसांनी म्हटलं, “अजितदादा साक्षीदार आणि भुक्तभोगी होते.”

यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “अजितदादा बरोबर पेन चालवत होते.” तर, अजितदादा मान खाली घालून हसायला लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com