Mahayuti Press Conference: महायुतीने मांडला अडीच वर्षांचा लेखाजोखा ; काय आहे रिपोर्ट कार्डमध्ये?

Mahayuti leaders Press Conference: महाराष्ट्रात महायुतीने आणलेला बदलांचा अहवाल आम्ही प्रकशित केला आहे. जनतेल्या आयुष्यातील बदलांचा हा लेखाजोखा आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रतिसादामुळे विरोधक गडबडले आहेत, असे अजित पवार म्हणाले.
Mahayuti leaders
Mahayuti leadersSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानसभा निवडणुकीची तारीख काल (बुधवारी) जाहीर झाल्यानंतर आज महायुतीने पत्रकार परिषदेत आपल्या अडीच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडला. महायुतीनं आपलं रिपोर्ट कार्ड प्रकाशित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे नेते उपस्थित होते.

टोलमाफी, महिला, युवक, कामगार यांच्यासाठी आणलेल्या कल्याणकारी योजना राबवून महायुतीने सर्वसामान्य जनतेसाठी काय केले, याची माहिती दिली. पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. आम्ही एवढी कामे केली आहे. ती या लहानशा रिपोर्ट कार्डमध्ये बसणार नाही. रिपोर्ट कार्ड करण्यासाठी हिमंत लागते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. मोठी कामे रिपोर्ट कार्डमध्ये मावत नाही, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे यांनी त्यांना टोमणा हाणला. आघाडी सरकारच्या काळात अनेक प्रकल्प बंद होते, ते आम्ही सुरु केले. महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर आणले, विरोधकांना पराभव दिसू लागला आहे, ते गोंधळले आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.

कॉमन मॅनला आम्हाला ताकद द्यायची आहे, त्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. आम्हाला काॅमन मॅनला सुपरमॅन करायचे आहे. आमची देण्याची नियत आहे. सर्वसामान्य माणसांसाठी आम्ही चांगले निर्णय घेतले. लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Mahayuti leaders
MVA Seat Sharing: काँग्रेसचं मोठा भाऊ ? काँग्रेसला ८४ तर शरद पवार पक्ष, उद्धव ठाकरे पक्षाला इतक्या जागा मिळणार

विविध योजना जाहीर करताना आम्ही तिजोरी मोकळी केल्याचा आरोप आमच्यावर विरोधक करीत आहेत. आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही काम करीत असताना सर्व घटकांना सामावून घेतले, असे अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्रात महायुतीने आणलेला बदलांचा अहवाल आम्ही प्रकशित केला आहे. जनतेच्या आयुष्यातील बदलांचा हा लेखाजोखा आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रतिसादामुळे विरोधक गडबडले आहेत. ही योजना कायमस्वरुपी आहे. त्यामुळे आरोप करताना विरोधकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, असे अजितदादांनी सुनावले. काम हीच आमची ओळख, असे अजित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. महायुतीने अडीच वर्षाच जे गेले, त्याचा अहवाल आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. स्थगिती सरकार गेल्यानंतर आमचे गतिशील सरकार जनतेने पाहिले आहे. आमच्या सरकारच्या कामाची गती ही महाराष्ट्राची प्रगती सांगणारी आहे. प्रगती करणाऱ्या योजना आम्ही आणल्या,"

शेतकऱ्यांनी जे वीजबील माफ केले आहे, ते पुढे सुरु राहणार आहे. वीजेच्या बाबतीत शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचे काम सरकारने केले आहे. आघाडीच्या काळाच ठप्प झालेले सिंचनांच्या कामाला आम्ही गती दिली. अनेक दुष्काळी भागात कामाला सुरवात केली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

फेक नरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. महायुतीने गतीने काम करीत आहे. गुजरातपेक्षा सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रात आहे, असे फडणीस म्हणाले. मविआ म्हणजे गुजरातचे ब्रँड अँम्बिसिडर आहे, असा टोला महााविकास आघाडीला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com