Nashik News : समोरच्या संघाची मानसिकता काय, हे पाहून डावपेच लढवावे लागतात. कधी कोणत्या डावपेचांचा वापर करावा लागेल, याचा नेम नसतो. प्रतिस्पर्धी खेळांडुची मानसिकता ओळखून आपली चाल चालावी लागते. चपळाई सुद्धा आवश्यक असते, असे सल्ले राज्यातील पोलिस खेळांडूना देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अप्रत्यक्षरित्या विरोधकांवर निशाणा साधला.
मुंबईतील ठाकरे गटाचे जागेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर(Ravindra Waikar) हे लवकरच शिंदे गटात सहभागी होतील, अशी चर्चा सकाळपासून सुरू असून, यापार्श्वभूमीवर शिंदे यांनी शालजोडीतून दिलेले टोले चर्चेचा विषय ठरले आहेत. महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे आयोजीत होणाऱ्या 34व्या महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेच्या उद्धाटन कार्यक्रमावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंडाचे फोटो ट्विट करीत शिवसेनेचे नेते संजय राऊत हे शिंदे यांना टार्गेट करत आहेत.
तसेच ठाकरे गटाचा मुंबईतील आणखी एक आमदार शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा सकाळपासूनच सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्घाटन सोहळ्यानिमित्त पोलिसांना सल्ला देतानाच विरोधकांवर निशाणा साधण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केले.
एकनाथ शिंदे म्हणाले, काम करताना आपल्यात चपळाई हवी. बळ, कौशल्य आवश्यक असते. तसेच प्रतिस्पर्धी संघाचा अंदाज घेऊनच डावपेच आखावे लागतात. खेळताना फक्त ताकद असून चालत नाही. प्रतिस्पर्धी खेळाडुंची मानसिकता ओळखून आपली चाल चालावी लागते, असा सल्ला देताना मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरले नाही.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पोलिस महासंचालकांवर मुख्यमंत्र्यांनी अचानक गुगली टाकली. आपले पोलिस चांगले काम करतात. सध्या आपले पोलिस स्कॉटलॅण्डबरोबर आहेत, ना असा प्रश्नच शिंदे यांनी राज्याच्या पोलिस महासंचालक पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे पाहत केला. अप्रत्यक्ष विरोधकांवर होणारी टीका आणि पोलिसांना मिळणारे सल्ले मन लावून ऐकणाऱ्या पोलिस महासंचालक शुक्ला मुख्यमंत्र्याच्या प्रश्नासाठी तयारच नव्हत्या. शिंदेच्या प्रश्नाने काहीशा गडबडलेल्या शुक्ला यांनी लागलीच सावरून घेत आपले पोलिस सध्या स्कॉटलॅण्ड पोलिसांच्या बरोबरीत असल्याचे सांगून वेळ मारून नेली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.