Jarange On Raj Thackeray : नाशिकचं पाणीच वेगळं हाय; राज ठाकरेंच्या प्रश्नावर जरांगे पाटलांचं उत्तर

Maratha Reservation : जरांगे पाटील यांनी नेमका कोणत्या विजयाचा गुलाल उधळला, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
Raj Thackeray- Manoj Jarange Patil
Raj Thackeray- Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राज ठाकरे यांचं व्यक्तीमत्व चांगलं आहे. त्यांच्या पाठीशी तरुणवर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. ते आरक्षणाविरोधात कधीच काही बोलत नाहीत. नाशिकला आल्यानंतर ते काही बोलले असतील, तर नाशिकचं पाणीही तसंच असल्याचे म्हणत जरांगेंनी भुजबळांचे नाव न घेता टीका केली. ठाकरे यांचा तो प्रश्न नाशिकपुरताच मर्यादीत होता, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. (Manoj Jarange Patil's reply to a question raised by Raj Thackeray)

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेला विराट मोर्चा ऐतिहासिक ठरला. लाखो मराठा समाज बांधव त्यांच्या सोबत मुंबईकडे चालत गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोर्चा मुंबईला पोचण्यापूर्वीच वाशी येथे वाटाघाटी सुरू केल्या होत्या. जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करीत तशी अधिसूचना सरकारने मराठा समाजाच्या हाती दिली. जरांगे पाटील यांच्यासह गुलाल उधळत मराठा मोर्चेकरी माघारी फिरले. (Jarange Patil On Raj Thackeray)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray- Manoj Jarange Patil
Madha Loksabha : माढ्यात दोन सिंहांमध्येच होणार लढत...शरद पवार गटाकडून ‘हे’ नाव निश्चित?

नाशिक दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नेमके याच बाबीवर बोट ठेवत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जरांगे पाटील यांनी नेमका कोणत्या विजयाचा गुलाल उधळला, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला होता. मी स्वत: जरांगे पाटील यांच्याशी बोललो होतो. सरकारकडून अधिसूचनेच्या आडून धूळफेक होत असल्याचे सांगितले होते. कायदा मंजूर झालेला नसताना विजयोत्सव कसा साजरा झाला, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांना याच अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी राज ठाकरे यांची स्तुती केली. राज ठाकरे यांच्या पाठीशी तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. ते आरक्षणाविरोधात कधीच काही बोलत नाहीत. नाशिकला आल्यानंतर ते काही बोलले असतील, तर नाशिकच पाणीही तसंच असल्याचे म्हणत जरांगे यांनी भुजबळांचे नाव न घेता टीका केली. ठाकरे यांचा तो प्रश्न नाशिकपुरताच मर्यादीत होता. त्यानंतर ते बोलले नाहीत, याकडे जरांगे पाटील यांनी लक्ष वेधले.

Edited By : Vijay Dudhale

Raj Thackeray- Manoj Jarange Patil
Vasant More Status : शर्मिला ठाकरेंचे ‘ते’ विधान अन्‌ वसंत मोरे म्हणतात ‘पुणे की पसंत...मोरे वसंत’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com