पालघर जिल्हापरिषद निवडणुकीत श्रमजिवीचा पाठिंबा गुलदस्त्यात

पालघर जिल्हापरिषदेच्या (Palghar Jilhaparishad) 15 जागा आणि जिल्ह्यातील पंच्यायत समितीच्या 14 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
Palghar Zilha parishad
Palghar Zilha parishad
Published on
Updated on

संदीप पंडित

विरार : पालघर जिल्हापरिषदेच्या (Palghar Jilhaparishad) 15 जागा आणि जिल्ह्यातील पंच्यायत समितीच्या 14 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर आता पालघरमध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष विविध संघटनांचा पाठिंबा मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे. पालघर जिल्ह्यात आदिवासींची मोठी संघटना म्हणून श्रमजीवी संघटनेकडे (Shramjivi Organization) बघितले जाते. या संघटनेची जिल्ह्यात मोठी ताकद असल्याने श्रमजीवी कोणाला पाठिंबा देते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Palghar Zilha parishad
वसई-विरार महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलणार?

सध्या तरी श्रमजीवीने आपले पत्ते उघड केले नाहीत. पण येत्या एक दोन दिवसात संघटनीची बैठक होणार असून त्यात पाठीम्ब्याचा निर्णय होण्याची श्यक्यता वर्तविण्यात येत आहे. पालघर या आदिवासी जिल्ह्यात आदिवासींची मोठी संघटना म्हणून विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखालील श्रमजीवी संघटनेचे नाव घेतले जात आहे. या संघटनेची जिल्ह्यात मोठी ताकद असल्याने संघटनेला आपल्याकडे वळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरु केलेत.

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित (Vivek Pandit) हे दौऱ्यावर असून ते आज परतणार आहेत. त्यानंतर श्रमजीवीची प्रत्यक मतदार संघाचा आढावा घेऊन कोणाला पाठिंबा द्याचा याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com