वसई-विरार महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलणार?

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये म्हणजे एका प्रभागात तीन नगरसेवक आल्याने प्रभागाची चतुर्सीमा लोकसंख्येच्या मानाने होणार आहे.
वसई-विरार महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलणार?
Published on
Updated on

संदीप पंडित

विरार : वसई विरार महानगरपालिका (Vasai Virar Municipal Corporation) निवडणूक मागील वर्षभरापासून कोविड (Covid 19) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडत असतानाच "आयुक्त तथा प्रशासकाच्या" माध्यमातून सत्ता चालवणाऱ्या मविआ सरकारने सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) रद्द केलेल्या "ओबीसी" आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्याला काही राजकीय तोडगा निघतो का यासाठी वेळ मिळावा म्हणून मुंबई वगळता सर्व मनपा क्षेत्रात बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घोषित केला. म्हणजे आता पुन्हा नव्याने प्रभाग रचना, आरक्षण सोडत व निवडणूक कार्यक्रम लागताना किती वेळ लागतो हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. आता नव्याने वसई विरार पालिकेच्या 115 प्रभागाचे बहु सदस्यीय पद्धतीमुळे 38 प्रभाग होणार असून या ठिकाणी पुन्हा आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असल्याची श्यक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये म्हणजे एका प्रभागात तीन नगरसेवक आल्याने प्रभागाची चतुर्सीमा लोकसंख्येच्या मानाने होणार आहे. यात काही प्रभागात जास्त मतदार तर काहीमध्ये कमी मतदार असण्याची श्यक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आता ह्यात फायदा कुणाला तोटा कुणाला ? ज्यांनी ज्यांनी ठराविक मतदारसंघावर उमेदवारीची नजर ठेवत काम केले, संपर्क ठेवला त्यांना आता पुन्हा नव्या संभावित आरक्षणाची प्रतीक्षा करावी लागेल. ज्यांचे प्रभाग आरक्षणात हरवले होते अशांना पुन्हा नवीन उमेद निर्माण झाली आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत इच्छुक उमेदवारांची संख्याही जास्त असेल, म्हणजे स्पर्धा आलीच. बरे दिलेल्या एकाच पक्षाच्या तीन उमेदवारांना मतदार डोळेझाक मतदान करतीलच ह्याची शाश्वती नाही. एक चांगल्या उमेदवाराचा जसा इतर दोन उमेदवारांना मते मिळवण्यात फायदा मिळू शकतो तसाच एक चुकीचा उमेदवार अथवा नापसंतीचा उमेदवार इतर दोन उमेदवारांची मतेही घटवू शकतो. म्हणजेच क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या नव्या प्रभाग रचनेचा फायदा वसई विरार मध्ये महाविकास आघाडीला होतो,कि आता पर्यंत सत्तेवर राहिलेल्या बहुजन विकास आघाडीला होतो. हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.

वसई-विरार महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलणार?
'मेलेले कॉंग्रेसवाले उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये घेतल्यानं जिवंत झाले'

नव्या प्रभाग रचनेत 115 प्रभागाचे 38 प्रभाग होण्याची श्यक्यता आहे. यामध्ये 37 प्रभाग हे 3 सदस्यीय असतील तर 1 प्रभाग हा 4 सदस्यांचा असण्याची श्यक्यता आहे. 58 महिला आणि 57 पुरुष असे सूत्र असणार आहे. या मध्ये 19 प्रभागात 2 महिला एक पुरुष तर तेवढ्याच 19 प्रभागात 2 पुरुष आणि एक महिला असण्याची शक्यता आहे. नव्याने प्रभाग रचना झाल्याने पुन्हा या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि 50टक्क्या खालील ओबीसी आरक्षण अशी सोडत काढावी लागणार आहे.

शासनाने विचारपूर्वक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला आहे . या निर्णयाचे आम्ही समर्थन करत आहोत.

राजाराम मुळीक, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

राज्य शासनाने कोणत्याही पद्धतीने निवडणुका घेतल्या तरी भारतीय जनता पार्टी हा आमचा पक्ष एक नम्बरवर राहणार आहे. आम्ही निवडणुकीला तयार आहोत. फक्त आता निवडणुका न लांबविता लवकर घेण्यात याव्यात.

राजन नाईक, जिल्हाध्यक्ष भाजप

वसई विरार साठी भुसदस्यीस प्रभागाचा निर्णय फायदेशीर त्यामुळे अनेकांना संधी उपलब्ध होणार आहे . त्याचप्रमाणे प्रभाग रचनेत जी विषमता आहे. ती याने दूर होईल . असे असले तरी गावांचा निकाल येणे बाकी आहे, तो आल्यानंतर यात अजून बदल होण्याची श्यक्यता आहे.

ओनील अल्मेडा , जिल्हाध्यक्ष , काँग्रेस

हा शासनाने घेतलेला राजकीय निर्णय आहे. जे सत्तेवर येतात ते प्रभागाची रचना आपल्या पद्धतीने करून घेत असतात. त्याचाच हा एक भाग आहे यातून निवडणुका लांबवून वसई विरार मध्ये प्रशासकाच्या आडून पालिकेवर अंकुश ठेवण्याचे काम सुरू आहे.आता तरी निवडणुका न्यायालयाच्या आदेशाने लवकर व्हाव्यात ही अपेक्षा

अजीव पाटील, प्रवक्ता बहुजन विकास आघाडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com