बुलेट ट्रेनला तातडीची मंजुरी; हा तर गुजरातसमोर झुकण्याचा प्रकार... महेश तपासे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath shinde यांच्या सातारा Satara जिल्ह्यातील मुळगावी दोन हॅलिपॅड Two Helipad आहेत. मात्र, अत्यावश्यक सोयीसुविधांचा Infrastructure अभाव आहे.
NCP Leader Mahesh Tapase
NCP Leader Mahesh Tapasesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : बेकायदेशीर सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनला मंजुरी देण्याचा तातडीचा निर्णय म्हणजे गुजरातसमोर झुकण्याचा प्रकार असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मुळगावी दोन हॅलिपॅड आहेत. मात्र, अत्यावश्यक सोयीसुविधांचा अभाव आहे. शाळकरी मुलांना होडीने प्रवास करावा लागतोय. रस्ते, पूल नाहीत याबाबत सुमोटो अंतर्गत याचिका उच्च न्यायालयाने दाखल करुन घेत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

NCP Leader Mahesh Tapase
बंडखोरांचा खर्च गॅस दरवाढीतून वसुल करणार का....महेश तपासे

श्री. तपासे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनला तत्परतेने मंजूरी द्यायला वेळ आहे आणि सोयीसुविधांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व ते करतात त्या ठाणे जिल्हयाला वाहतूक कोंडी, नागरी समस्यांनी ग्रासले आहे. याबाबत त्यांच्याकडे वेळ नाही. मात्र गुजरातसाठी धावणार्‍या बुलेट ट्रेनला मंजुरी द्यायला वेळ आहे असा टोला लगावतानाच महाराष्ट्राच्या प्रश्नावरदेखील तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com