बंडखोरांचा खर्च गॅस दरवाढीतून वसुल करणार का....महेश तपासे

दोन्हीकडे ५० बंडखोर आमदार Rebel MLA आणि ५० रुपयांची गॅस सिलेंडर दरवाढ Gas cylinder price hike हे आकडे काहीतरी संकेत देत आहेत, असेही महेश तपासे Mahesh Tapase म्हणाले.
NCP Mahesh Tapase
NCP Mahesh Tapasesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताच भाजप सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ केली आहे. यावरुन जनतेने काय तो निष्कर्ष काढावा. एक मोठ्या अदृश्य शक्तीने बंडखोर आमदारांवर जो काही खर्च केलाय, तो खर्च गॅस दरवाढीतून वसूल केला जात आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ५० आमदारांचे बंड आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर लगेचच केंद्रसरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ केली आहे. दोन्हीकडे ५० बंडखोर आमदार आणि ५० रुपयांची गॅस सिलेंडर दरवाढ हे आकडे काहीतरी संकेत देत आहेत, असेही महेश तपासे म्हणाले.

NCP Mahesh Tapase
Video: संजय राऊत कोण, मला माहित नाही; राऊतांचं नाव घेताच उदयनराजे का संतापले?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एक मोठ्या अदृश्य शक्तीने बंडखोर आमदारांवर जो काही खर्च केला असेल तो खर्च गॅस दरवाढीतून वसूल केला जात आहे का? अशी शंका आता जनतेतून व्यक्त व्हायला लागली आहे.

NCP Mahesh Tapase
Shivsena : राष्ट्रवादी-काॅंग्रेसमुळे होणारे नुकसान उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही ..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार आलंय आम्ही पेट्रोल - डिझेलवरील कर कमी करु, असा दिलासा देण्याचे वक्तव्य केलेले असतानाच दुसरीकडे भाजपने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ केल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त होत असल्याचे श्री. तपासे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com