महावितरणच्या अधिकाऱ्याला धमकी देणे लोणीकरांना भोवणार; उर्जामंत्र्यांचे कारवाईचे आदेश

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांना प्राप्तीकर आणि ईडी धमक्या मिळत होत्या. आता भाजप अधिका-यांनाही धमकी देत आहेत.
Babanrao Lonikar, Nitin Raut
Babanrao Lonikar, Nitin Rautsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि आक्षेपार्ह भाषा आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे. माजी मंत्री भाजप (BJP) आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी महावितरणच्या (MSEB) अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

या निमित्ताने राऊत यांनी लोणीकर यांनी ज्या मीटक क्रमांकाबद्दल तक्रार केली ते जाहीर केले आहेत. "ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस (Police) संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत, असे ही राऊत यांनी सांगितले. लोणीकर यांच्या ध्वनीफितीबद्दलच्या बातम्यांची मी दखल घेतली आहे. औरंगाबाद शहरातील अभियंत्यांसोबत केलेला संवाद हा धक्कादायक आहे. या ध्वनिफितीतील संवाद व भाषा अतिशय आक्षेपार्ह आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद भुषविलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. स्वतःला संस्कारी म्हणवणा-या एका पक्षाचे ३० वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या नेत्याच्या भाषेने या पक्षाच्या संस्काराचाही बुरखा फाटला आहे," असा टोलाही राऊत यांनी लगावला.

दोन मीटरचे वर्षभरात १० लाख बिल भरले असे लोणीकर म्हणत, असले तरी गेल्या सव्वा वर्षांपासून त्यांनी वीजबिल भरले नाही. १. ग्राहक क्रमांक- ४९००१४८८९१०५ राहूल बबनराव यादव हाऊस नं.५२, गट नंबर १४६, आलोक नगर, औरंगाबाद पीन कोड- ४३०००१. वीजबिल भरल्याची अखेरची तारीख- १८ जानेवारी २०२१ आहे. मार्च २२ अखेर एकूण थकबाकी-३ लाख २१ हजार ४७० रुपये आहे. सद्यस्थिती-वीज जोडणी खंडित केलेली नसून वीज पुरवठा अद्यापही सुरू आहे.

Babanrao Lonikar, Nitin Raut
काॅंग्रेसच्या 25 आमदारांमुळे ठाकरे सरकारची झोप उडालीय... काहीही होऊ शकतं!

ग्राहक क्रमांक- ४९००११००९२३६ नाव- आय. एस. पाटील पत्ता- प्लॉट नं.५५, गट नं.१४६, अशोकनगर जवळ, सातारा, औरंगाबाद, पिन कोड- ४३१००१. वीजबिल भरल्याची अखेरची तारीख- २७ मार्च २०१९, मार्च २२ अखेर एकूण थकबाकी ६७ हजार २०० रूपये. सद्यस्थिती-वीजबिल थकल्याने वीज पुरवठा तात्पूरता खंडित केला आहे.

लोणीकर हे १० लाख वीजबिल भरल्याचे सांगत असले तरी त्यांच्या दोन्ही घरांची थकबाकी जवळपास ४ लाख आहे, असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. लोणीकर यांनी महावितरणच्या अधिका-यांना निलंबित करण्याची धमकी देणे हा शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा व शासकीय अधिका-यांवर चुकीच्या कामांसाठी दबाव टाकण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना सातत्याने प्राप्तीकर आणि ईडी यांच्या धाडी टाकण्याची धमकी भाजप नेते देत असतात. आता ही धमकी अधिका-यांनाही देण्यापर्यंतची पातळी या नेत्यांनी गाठली. हे अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला हे शोभणारे नाही. त्याबद्दल लोणीकर यांनी महाराष्ट्राची व महावितरणच्या अधिका-यांची माफी मागायला हवी, असेही राऊत म्हणाले आहेत. त्या बरोबर दलित वस्त्यांबाबत त्यांनी केलेले वक्तव्यही आक्षेपार्ह आहे. यावरून त्यांची दलित समाजाबद्दलची मानसिकता दिसून येते, असेही राऊत म्हणाले आहेत.

व्हायरल ऑडिवो क्लिपवर लोणीकर म्हणाले?

वीजबिल वसुलीला माझा विरोध असल्यामुळे माझ्याविरोधात रचलेले हे षडयंत्र असल्याचा दावा लोणीकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. व्हायरल झालेली कॅसेट खोटी आहे, मी कुठल्याच वीज कंपन्याच्या अधिकाऱ्याला फोन केला नाही, माझ्या बंगल्याचे मीटर काढून नेले नाही, असा खुलासाही लोणीकर यांनी केला आहे. दिनदुबळ्या, शेतकरी, दलित, कष्टकरी, मजुरांची वीज हे सरकार सातत्याने कापते आहे. या विरोधात मी व भाजपचे सगळे आमदार सातत्याने सभागृहात आवाज उठवत असतो. पण महाविकास आघाडी सरकारला गरिबांचे दुःख समजत नाही.

Babanrao Lonikar, Nitin Raut
भाजप आमदाराचे वीज कनेक्शन तोडले.. करंट बसल्याप्रमाणे इंजिनिअरला फाडफाड बोलले

मराठवाड्यातील अनेक विकासकामांच्या योजना या सरकारने बंद करून टाकल्या आहेत, त्यासंदर्भात देखील मी सभागृहात वेळोवेळी आवाज उठवला. पण राजकीय सुडबुद्धीतून कुणी तरी माझ्या विरोधात षडयंत्र रचत ही खोटी कॅसेट व्हायरल केली आहे. औरंगाबादेत माझे दोन बंगले आहेत आणि त्याचे मीटर काढून घेतल्याचा उल्लेख या क्लीपमध्ये आहे. मुळात औरंगाबादेत माझा एकच बंगला आहे आणि त्याचे मीटर कुणीही काढून नेलेले नाही. त्यामुळे मी वीज अधिकाऱ्याला फोन करण्याचा आणि धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. व्हायरल झालेली कॅसेट खोटी आणि मला बदनाम करण्यासाठी व्हायरल करण्यात आल्याचेही लोणीकर म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com