Supreme Court Hearing: सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच फडणवीसांचं मोठं भाष्य; एकनाथ शिंदेंबाबत म्हणाले...

Supreme Court Hearing On Shivsena MLA: "एकनाथ शिंदे कशाकरता राजीनामा देतील. त्यांनी काय चूक केली?"
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Supreme Court Hearing On Shivsena MLA: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच उद्या (दि.11 मे) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायलाय देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. त्याचा निकाल अखेर उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे.

Devendra Fadnavis
Supreme Court News : सत्तासंघर्षाच्या युक्तीवादादरम्यान सरन्यायाधीशांनी केलेल्या महत्त्वपूर्ण टिप्पणी; निकालावर परिणाम होणार?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमची केस मजबूत आहे. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत. योग्य निकाल येईल तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे गांभीर्याने पाहिलं पाहीजे. त्याबाबत आत्ता अंदाज लावणं योग्य नाही. मात्र, आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत", असं फडणवीस यांनी म्हटलं.

Devendra Fadnavis
Maharashtra Poltical Crisis: सत्तासंघर्षाचा निकाल येण्याआधी विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळांचं मोठं विधान; नोटीस देण्याचा निर्णय...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.

फडणवीस म्हणाले, "माफ करा पण शब्द वापरतो, पण मूर्खांचा बाजार आहे. यापेक्षा जास्त काही बोलू शकणार नाही. एकनाथ शिंदे कशाकरता राजीनामा देतील. त्यांनी काय चूक केली? एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि पुढची निवडणुकही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढू", असंही फडणवीस म्हणाले.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com