Prithviraj Chavan ON MVA : एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते असतानाच 'महाविकास आघाडी'ची.. ; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट !

Prithviraj Chavan ON Eknath Shinde : "आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.."
Prithviraj Chavan ON Eknath Shinde
Prithviraj Chavan ON Eknath Shinde Sarkarnama

Mumbai News : राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली. शिवसेना-भाजपची पंचवीस वर्षांची युती संपुष्टात येऊन काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी असे नवे समीकरण जुळून आले. मात्र अशी आघाडी २०१४ विधानसभा निवडणुकीतच अस्तित्वात येण्याबाबत प्रस्ताव होता, असा मोठी गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Prithviraj Chavan ON Eknath Shinde
Prithviraj Chavan News: नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशातील लोकशाही धोक्यात येईल ; पृथ्वीराज चव्हाण असं का म्हणाले...

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या दीर्घ मुलाखतीत चव्हाण यांना हा दावा केला. "महाविकास आघाडीचे समीकरण २०१९ ला जुळून आले. मात्र त्यापूर्वीच 2014 मध्ये अशा प्रकारच्या आघाडीबाबत चर्चा घडून आली होती. ही चर्चा माझ्यापर्यंत आली होती. तेव्हा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. मात्र ही चर्चा काही म्हणावी तशी पुढे गेली नाही. दिल्लीतील हायकमांड यावर आक्षेप घेतील, असे मला वाटले," असा मोठा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Prithviraj Chavan ON Eknath Shinde
Mamata Banerjee On INDIA : 'इंडिया' आघाडीत बिघाडी ? जागावाटपावरून ममता बॅनर्जी नाराज ?

"विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. मात्र जवळपास एका महिन्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाला. मात्र महिनाभर एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेतेपदावर होते. याच काळामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भात राजकीय शक्यतांची चाचपणी केली होती. मात्र ही चर्चा जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मात्र, अशी राजकीय आघाडी अशक्य असून मी नकार दर्शवला होता," असे चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com