Prithviraj Chavan News: नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशातील लोकशाही धोक्यात येईल ; पृथ्वीराज चव्हाण असं का म्हणाले...

Congress Politics : पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कंबर कसून तयारीला लागली आहे.
Prithviraj Chavan News:
Prithviraj Chavan News: Sarkarnama

Kolhapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला हुकूमशाहीकडे घेऊन चालले आहेत. ते जर पुन्हा पंतप्रधान झाले तर देशातील लोकशाही धोक्यात येईल,अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कंबर कसून तयारीला लागली आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघातील परिस्थितीची चाचपणी केली जात आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन घटक पक्षांमध्ये फूट पडल्याने या फुटीचा प्रत्येक मतदारसंघात काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेतला जाणार आहे.

Prithviraj Chavan News:
Nagar News : मोठी बातमी : डॉ. सुधीर तांबेंचे निलंबन लवकरच मागे घेणार ; नगर जिल्हा काँग्रेसकडून हिरवा कंदील.

"देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने 2024 ची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पण देशाच्या राजकारणाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होते रशिया, चीनमध्ये जे झालं तेच नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये पुन्हा निवडूण आल्यास भारतही त्याच दिशेने देश जाईल. देशात संविधान अस्तित्वात राहणार नाही. असं म्हणत, पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकाही होतील की नाही, याबद्दलही शंका वाटते, असं टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'लोकशाहीच्या घटनात्मक संस्थाच भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. या संस्था एकाच माणसाच्या ताब्यात कशा राहतील आणि अशा लोकशाहीचा दिखावा होईल. या लोकशाहीचा आत्मा निघून जाईल. रशिया, चीन, जर्मनी आणि इटलीमध्ये दोन वेळेपेक्षा जास्त वेळ अध्यक्ष म्हणून राहता येत नाही. त्यासाठी काही देशांत अध्यक्षपदाचा कायदा आहे. मोदी विजयी झाले, तर आपला देशही त्याच दिशेने जाईल. देशात लोकशाही अस्तित्वात राहणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या मनातही भाजपविषयी धास्ती आहे.

Prithviraj Chavan News:
Ghodganga Sakhar Karkhana : घोडगंगा कारखान्याच्या कामगारांचे दीड महिन्यापासून आंदोलन; मदतीसाठी सरसावला शिरूर तालुका

राज्यातील आणि एकंदरीत देशातील परिस्थिती पाहता आता तर निवडणुकाही ग्राह्य धरून चालणार नाही. सोयीप्रमाणे निवडणुका घेतल्या जात आहेत.निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरण सुरू आहे. मत मिळवण्यासाठी धार्मिक राजकारण सुरू आहे. काँग्रेस सोडून राज्यातील- देशातील अनेक पक्ष भाजपसोबत गेले. काँग्रेस नेत्यांनाही इडी-सीबीआयच्या धमक्या, आमिषे देण्यात आली. पण काँग्रेसचा विचार कोणीही सोडला नाही. मोदींच्या या हुकूमशाही प्रवृत्तीला फक्त काँग्रेसच लढा देऊ शकते, असही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com