Maharashtra Cabinet Expansion: शिवसेनेपाठोपाठ मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपमध्येही वाढतेय अस्वस्थता...

Shinde-Fadnavis govt: भाजपच्या इच्छुक आमदारांनीही मंत्रिमंडळ विस्तारासाठी तगादा लावल्याची चर्चा
Maharashtra Cabinet Expansion:
Maharashtra Cabinet Expansion: Sarkarnama

Political News: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. पहिल्या विस्तारात संधी हुकलेले आणि नाराजीच्या चर्चा असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांना या मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा लागली आहे.

असे असतानाच आता भाजपच्या इच्छुक आमदारांनीही मंत्रिमंडळ विस्तारासाठी तगादा लावल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करून मंत्रीपदासाठी काही आमदारांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे साकडे घातल्याची माहिती सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

एवढंच नाही तर मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये देखील छुपी नाराजी असल्याचं बोललं जात आहे. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची आशा या आमदारांना दाखविल्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Maharashtra Cabinet Expansion:
Uday Samant News:..तर आम्ही देखील बारामतीवर दावा करू शकतो; उदय सामंतांचं मोठं विधान

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह २० जणांचे मंत्रिमंडळ आहे. पहिल्या टप्प्यातील विस्तार गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झाल्यानंतर दुसऱ्या विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा दिले. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी आजपर्यंत आठ वेळा विस्ताराच्या मुहूर्ताची चर्चा झाली.

पण चर्चा होऊनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने शिवसेनेत (शिंदे गट) उघड नाराजी दिसून आली. तर २३ किंवा २४ मे च्या दरम्यान मंत्र्यांचा शपथविधी होईल, याची चर्चा रंगली होती. मात्र, तसं काही झालं नाही.

भाजपचे आमदार उघडपणे याबाबत काही बोलत नव्हते. मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता दिसत नसल्याने मंत्रीपदाची आशा असलेल्या काही आमदारांनी वरिष्ठ नेत्यांकडे ग्राहाणी मांडल्याचे समजते.

Maharashtra Cabinet Expansion:
Election Commission News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार? निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका सव्वा दीड वर्षावर असताना आणखी काही आमदारांना विस्तारात घेण्याची अपेक्षा या आमदारांची व्यक्त केली असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या (शिंदे गट) संभाव्य आमदारांची नावे निश्चित झाली आहेत. पण भाजपकडून विस्ताराचे ठरत नसल्याकडे शिवसेनेचे आमदार बोट दाखवत आहेत. यातूनच आता भाजपच्या आमदारांनी श्रेष्ठींकडे धाव घेतल्याची चर्चा आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com