Uday Samant News
Uday Samant NewsSarkarnama

Uday Samant News:..तर आम्ही देखील बारामतीवर दावा करू शकतो; उदय सामंतांचं मोठं विधान

Political news: लोकसभेच्या जागा लढवण्याबाबतही उदय सामंतांचं मोठं भाष्य
Published on

Ratnagiri: 'प्रहार'चे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 ते 20 विधानसभा मतदारसंघातून प्रहार निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं. याबरोबरच लोकसभेसाठी त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावरही दावा ठोकला. बच्चू कडू यांनी केलेल्या या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडूंनी केलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघावरील दाव्याच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं आहे. "कुणी कुठेही दावा करावा? हा वैयक्तिक प्रश्न आहे. बच्चू कडू यांनी हा दावा का केला? हा प्रश्न त्यांनाच विचारा", अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Uday Samant News
Uday Samant News: वाईट शक्तींचा करेक्ट कार्यक्रम करणार; उदय सामंतांचा रोख कुणाकडे?

पुढे बोलताना ते म्हणाले की,"मी देखील बारामतीवर दावा करू शकतो. अर्थात कुणी कुठेही दावा करू शकतो. कुणी कुठे दावा करावा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे", असं म्हणत बच्चू कडू यांनी केलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या दाव्याच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

Uday Samant News
Chhatrapati Sambhajinagar NCP Camp: राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय शिबीर जूनमध्ये ; शरद पवार, अजित पवार येणार...

दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपचा डोळा आहे, अशी टीका विरोधक करत होते. याबाबत आता सामंतांनी भाष्य केलं आहे. "आमच्या जागांवर भाजपचा डोळा नाही, पण प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. आम्ही युती म्हणून लढणार आहोत आम्ही जेवढ्या जागा लढल्या होत्या तेवढ्या जागा आम्ही लढणार आहोत", असंही त्यांनी सांगितलं.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com