शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? फडणवीसांनी दिली नवी तारीख

Devendra Fadanvis| आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल, असे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते
Devendra Fadanvis|
Devendra Fadanvis|
Published on
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तेरा दिवस झाले. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुहूर्त सरकारला मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असे सवाल उपस्थित होऊ लागले आहे.

अशात शिंदे सरकाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा सवाल विचारला असता, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमची चर्चा सुरू आहे, विस्ताराची तारीखला ठरली की सर्वात आधी मी तुम्हाला सांगेन, असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी बोलण्याचं टाळलं.

Devendra Fadanvis|
Ncp : सांस्कृतिक मंत्री म्हणून अमित देशमुख फेल ; त्यांच्या काळात कलावंताचे मोठे नुकसान..

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत, आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल, असे दोन्ही नेत्यांनी सांगितले होते. मात्र आता राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा आठवडाभर लांबणीवर पडल्याचे दिसत आहे. येत्या 18 जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा सर्व आमदार मुंबईत येतील. त्याच कालावधीत शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तर आमदारांना पुन्हा मुंबईत बोलवायचा खर्च टाळण्यासाठी भाजपने हा प्लॅन आखल्याचंही सांगितलं जात आहे. आता १९ जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे.

तर दूसरीकडे, भाजपा आणि शिंदे गटात मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाला 27 आणि शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. असे असताना आपल्याला चांगले मंत्रिपद मिळावे यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत. शिंदे गटासह भाजप नेत्यांनीही गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आजही आमदार संजय शिरसाट आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शिंदे-फडणवीसांचा शपथविधी झाल्यानंतर आज (13 जुलै) तारखेला मंत्रिमंडळातील पहिल्या 13 मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे सांगण्यात आले होत. मात्र आता 18 तारखेनंतर होणाऱ्या शपथविधीमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळाचाच होईल, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com