
Devendra Fadnavis: नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जय किसान’ची घोषणा दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्प शेतकऱ्यांना समर्पित करत फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना मांडल्या आहेत.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित मांडला आहे. यामध्ये शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकासरोजगारनिर्मिती: सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास ही ध्येये ठेवण्यात आली आहेत.
नैसर्गिक आपत्तीत नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आता शेतकर्यांना केवळ एक रुपयात पीकविमा मिळणार आहे. आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतली जात होती. आता शेतकर्यांवर कोणताच भार पडणार नाही. राज्य सरकार हप्ता भरणार आहे. यासाठीचा तीन हजार ३१२ कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे.
पीकविमा योजनेसह मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला हरितगृह असा विस्तार करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी राज्याकडून 'नमो शेतकरी महा सन्मान योजने'ची घोषणा फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे. शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये निधी मिळणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.