मुंबई : भारताची (India) गान कोकिळा लता मंगेशकर यांचे आज (6 फेब्रुवारी) निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न दिसून येत नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Lata Mangeshkar Passes Away)
लता मंगेशकर: जन्म आणि बालपण
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या भावंडांमध्ये लतादीदी आपल्या आईवडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. लतादीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.
1942मध्ये लतादीदी 13 वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडीलांचे हृदयविकाराने निधन झाले . तेव्हा मंगेशकरांचे एक जवळचे नातेवाईक आणि नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लतादीदींच्या कुटूंबियांची काळजी घेतली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.
- गायन आणि चित्रपटसृष्टीत पदार्पण
लता मंगेशकर यांनी 'पहिली मंगळागौर' या चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. त्या भारताच्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. भारतीय संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. 1942 मध्ये लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळापासून त्यांची ही कारकीर्द टिकून आहे.
मास्टर दीनानाथ यांच्याप्रमाणेच ‘भेंडीबाजारवाले’ खाँसाहेब अमानअली आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ हेदेखील लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरू होते. भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानतखाँ यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खॉं साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मां यांच्याकडूनही लतादीदींना शास्त्रीय संगातीच तालीम मिळाली.
- लतादीदींनी गायलेली गाणी
अनेक ख्यातनाम संगीतकारांची, सुमारे 1800 हून अधिक चित्रपटांतील विविध प्रकारची २२ भाषांतील गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांची संख्या सुमारे 25 ते 30 हजारांच्या घरात सहज जाते. लता दीदींचा सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून त्यांचा उल्लेख आहे.
-लता दीदींना मिळालेले पुरस्कार
फिल्मफेअर पुरस्कार (1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994)
राष्ट्रीय पुरस्कार (1972, 1975 आणि 1990)
महाराष्ट्र शासन पुरस्कार (1966 आणि 1967)
1969 - पद्मभूषण
1974 - जगातील सर्वाधिक गाण्यांचा गिनीज बुक रेकॉर्ड
1989 - दादासाहेब फाळके पुरस्कार
1993 - फिल्मफेअर लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड
1996 - स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार
1997 - राजीव गांधी पुरस्कार
1999 - NTR बक्षीस
1999 - पद्मविभूषण
1999 - झी सिनेचा जीवनगौरव पुरस्कार
2000 - I.I.A. एफ. चे जीवनगौरव पुरस्कार
2001 - स्टारडस्ट जीवनगौरव पुरस्कार
2001 - भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "भारतरत्न"
2001 - नूरजहाँ पुरस्कार
2001 - महाराष्ट्र भूषण
लतादीदींची थोडक्यात माहिती
- वडील दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते.
- 1942 मध्ये आलेल्या 'किती हसाल' या मराठी चित्रपटात लतादीदींना पहिल्यांदा मराठी गाणे गायले.
- लता मंगेशकर यांना महल या चित्रपटातून सर्वात मोठा ब्रेक मिळाला. त्यांनी गायलेले "आयेगा आने वाला" सुपरडूपर हिट ठरले.
- लता मंगेशकर यांनी आतापर्यंत 20 हून अधिक भाषांमध्ये 30000 हून अधिक गाणी गायली आहेत.
- लता मंगेशकर यांनी 1980 पासून चित्रपटांमध्ये गाणे कमी केले आणि स्टेज शोवर अधिक लक्ष केंद्रित केले.
- लता या एकमेव जिवंत व्यक्ती आहेत ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात.
- लता मंगेशकर यांनी आनंद घनच्या बॅनरखाली चित्रपटांची निर्मिती आणि संगीतही केले आहे.
- लतादीदी नेहमी अनवाणी पायाने गाणे गायच्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.