Rohit Pawar Latest Marathi News, Ajit Pawar News
Rohit Pawar Latest Marathi News, Ajit Pawar NewsSarkarnama

Rohit Pawar : शेतकरी उद्धवस्त झालाय...! रोहित पवारांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी

Rohit Pawar | राज्य सरकार रोहित पवारांची मागणी मान्य करणार का?

मुंबई : राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. ''अतिवृष्टीमुळे जवळपास २५ लाख शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असबन परतीच्या पावसाने ४५ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. राज्यातील बहुतांश ठिकाणी तर दोनदा-तीनदा शेतपिकांचं नुकसान झाले आहे.'' असे सांगत त्यांनी लक्ष वेधलं आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत राज्य सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. ''राज्यात आतापर्यंत १२३ 'टक्के पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा २३ % अधिक आहे. यंदा जुलै-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं जवळपास २५ लाख शेतकऱ्यांना फटका बसला तर आता सुरु असलेल्या परतीच्या पावसाने ४५ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. बहुतांश ठिकाणी तर दोनदा-तीनदा नुकसान झालंय.

Rohit Pawar Latest Marathi News, Ajit Pawar News
ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरोधात समीर वानखेडेंची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार

एकंदर संपूर्ण हंगामच वाया गेल्याने यंदाची परिस्थिती अतिशय भयाण आहे. राज्याच्या सर्वच भागातील शेतकरी पूर्णतः उध्वस्त झालाय. अशा कठीण प्रसंगी राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे.'' असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

मा. देवेंद्र फडणवीस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रविण दरेकर यांनी आपण सर्वांनी मागील काळात ओला दुष्काळ जाहीर करण्याची केलेली मागणी निश्चितच शेतकरी हिताची होती. आताही तीच भूमिका घेऊन त्वरित ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आपण प्रयत्न कराल,ही अपेक्षा! अशीमागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com