Dombiwli Bandh : शिंदे गट-भाजपच्या डोंबिवली बंदला अल्प प्रतिसाद; तीन रिक्षांची तोडफोड

रिक्षाचालकांचे आपापसातील वाद आहेत, त्यातून ही तोडफोड झाल्याचे उत्तर देत याविषयावर पडदा पाडण्याचे काम पोलिस करत आहेत. त्यांच्यावर राजकीय दबाव येत असल्याची चर्चा आहे.
Dombiwli Bandh
Dombiwli Bandh Sarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : शिवसेनेच्या (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेना (Eknath shinde Group), भाजप (BJP), बजरंग दल, हिंदुत्ववादी संघटनेने डोंबिवली (Dombiwli) बंदची घोषणा केली होती. सकाळपासून या बंदला अल्प प्रतिसाद मिळत होता. डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटनेने या बंदला पाठिंबा दिला होता. मात्र, इतर रिक्षा चालक-मालक संघटनांनी मात्र या बंदला विरोध केला होता. (Few response to Shinde group-BJP's Dombiwli bandh; Three rickshaws vandalized)

डोंबिवली शहरातील सर्व रिक्षा शनिवारी सकाळी सुरळीतपणे सुरू होत्या. सकाळी नऊच्या दरम्यान काही संघटनांनी रिक्षाचालकांना दमदाटी करत रिक्षा बंद करण्यास सांगितले. यावेळी काही रिक्षांची तोडफोड करण्यात आली. यातील सुरेश पवार, माणिक राठोड आणि अभिजित सुर्वे या तीन रिक्षाचालकांनी टिळक नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नांदीवली मठ, पांडुरंग वाडी परिसरात या घटना घडल्या आहेत.

Dombiwli Bandh
दुर्दैवी : मतदान साहित्य आणण्यासाठी निघालेल्या तरुण शिक्षकाचा अपघाती मृत्यू

याविषयी टिळकनगर पोलिसांनी मात्र बंद दरम्यान असा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. रिक्षाचालकांचे आपापसातील वाद आहेत, त्यातून ही तोडफोड झाल्याचे उत्तर देत याविषयावर पडदा पाडण्याचे काम पोलिस करत आहेत. त्यांच्यावर राजकीय दबाव येत असल्याची चर्चा आहे.

Dombiwli Bandh
Daund News : मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने हिंदू तरुणाची जबरदस्तीने केली सुंता

दरम्यान, टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुपारपासून काही राजकीय मंडळी ठाण मांडून बसले आहेत. इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अशा घटना घडल्या असून रिक्षा तोडफोडीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com