Salman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील (Salman Khan) घराबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर विरोधकांनी गोळीबाराच्या घटनेनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.
तर गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सलमान खानशी फोनवरुन चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी (Mumbai Police Commissioner) चर्चा करून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. गोळीबारानंतर सलमान खानच्या घराबाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबईत भर रस्त्यावर गोळीबार होत असेल तर ही बाब गंभीर आहे. 'अब की बार गोळीबार सरकार' असं मी नेहमी म्हणते त्यावर आणखी एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्यात गोळीबार झाला. सत्तेत असलेल्या आमदाराने गोळीबार केला होता. पोलिस ठाण्यात गोळीबार करण्याची हे लोक हिम्मत करत असतील, तर रस्त्यावर गोळीबार करणे हे सत्तेतील लोकांना फार काही वाटणार नाही. महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली असून हे गृहमंत्र्याच अपयश असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानला मागील अनेक वर्षांपासून गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे ही बाब गंभीर मानली जात आहे. त्यामुळेच त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.