CM Shidne : 'आधी कामगारांची थकबाकी द्या मगच क्लस्टरचे काम' ; भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा!

BJP MLA Sanjay Kelkar : दहा वर्षानंतरही कामगारांना एकनाथ शिंदेंकडून केवळ आश्वासनच!
BJP MLA Sanjay Kelkar
BJP MLA Sanjay KelkarSarkarnama
Published on
Updated on

Thane News : गरिबांना घरकुल देणारा मुख्यमंत्र्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या क्लस्टर योजनेच्या कामाचे भूमिपूजन जिथे झाले. त्या ठाण्यातील वागळे इस्टेट येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) भूखंड क्रमांक एफ-2 वरील तत्कालीन इंडियन रबर कंपनीच्या साडेचारशे कामगारांना त्यांची जवळपास 40 वर्षांपासूनची थकबाकी अद्यापही मिळालेली नाही. या मुद्य्यावरून भाजप आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंना सूचना वजा इशाराच दिल्याचे समोर आले आहे.

कामगारांनी रविवारी शासकिय विश्रामगृहात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी काही वृद्ध कामगारांनी दहा वर्षांपूर्वी सुद्धा त्यांना एकनाथ शिंदे यांनी आश्वासनच दिले होते असे सांगितले. त्यामुळे आता आधी कामगारांची थकबाकी द्या, नंतरच क्लस्टरचे काम सुरू करा, असं आमदार केळकर यांनी म्हटलं आहे. याशिवाय मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP MLA Sanjay Kelkar
Nitin Karir : नितीन करीर महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव!

आशिया खंडातील ठाण्यातील सर्वात जूनी औद्योगिक वसाहत असलेल्या वागळे इस्टेट रोड नं 22 येथील एमआयडीसी क्षेत्रातील भूखंड क्रमांक एफ - 2 येथे 1963 पासून इंडियन रबर कंपनी होती. या कंपनीत 465 कामगार काम करीत, यापैकी 90 टवके कामगार मराठी होते. सन 1982 मध्ये प्रजासत्ताक दिनी कंपनी अचानक बंद करण्यात आल्याने सर्व कामगार देशोधडीला लागले.

कुठलीही देणी न देता कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. लेबर कोर्ट हायकोर्ट यांनी कामगारांच्या बाजुने निकाल दिला. परंतु काहीच न्याय मिळालेला नाही. मागील 40 वर्षात वारंवार मागण्या आणि निवेदने देऊन देखील अद्याप दमडीही मिळालेली नाही.

दरम्यान, थकबाकी मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्यांपाकी आतापर्यत या कंपनीतील 200 कामगारांचे निधन झाले. पण थकबाकी मिळालेली नाही, आणि आता ही जागा क्लस्टरसाठी दिल्याने कामगार हतबल आणि संतप्त झाले आहेत. या कामगारांसाठी आमदार संजय केळकर सातत्याने लढा देत आहेत, प्रत्येक अधिवेशनात या कामगारांचा विषय केळकर यांनी उचलला. तरीही अद्यापपावेतो या कामगारांना न्याय मिळालेला नाही.

BJP MLA Sanjay Kelkar
Vivek Phansalkar: पोलिस महासंचालक रजनीश सेठ निवृत्त; अतिरिक्त कार्यभार विवेक फणसळकरांकडे सोपवला

त्यामुळे, संतप्त झालेल्या कामगारांनी शनिवारी क्लस्टरच्या भूमीपूजनदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रविवारी आमदार केळकर यांना विनंती केली. त्यानुसार, रविवारी शासकिय विश्रामगृहात कामगारांची बैठक झाली. या बैठकीत, आधी कामगारांची थकबाकी द्यावी, नंतरच क्लस्टरचे काम करा. असा सूचना वजा इशारा दिला गेला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य कामगारांची व्यथा जाणुन सकारात्मक निर्णय घेतील असा आशावादही केळकर यांनी व्यक्त केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com