Nitin Karir : नितीन करीर महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव!

Chief Secretary of Maharashtra : मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून आजच पदभार स्वीकारणार .
Nitin Karir
Nitin KarirSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते राज्याच्या सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत.

1988च्या बॅचचे IAS असलेले डॉ. नितीन करीर हे आजच मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.

सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक रविवार 31 डिसेंबर 2023 ला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती केली जाणार आहे. 2020च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान करीर यांच्यावर महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitin Karir
Maharashtra DGP : राज्याचे नवे पोलिस महासंचालक कोण,विवेक फणसळकर की रश्मी शुक्ला?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्य सचिव असणाऱ्या मनोज सैनिक यांनाच मुदतवाढ दिली जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र नितीन करीर यांची या महत्त्वपूर्ण पदावर वर्णी लागल्याने याबाबतच्या चर्चा थांबल्या आहेत.

विशेष म्हणजे प्राप्त माहितीनुसार नितीन करीर यांच्या नावासाठी राज्य मंत्रिमंडळातीलच काही सदस्य आग्रही होते. एवढच नाहीतर काही मंत्र्यांनी नितीन करीर यांच्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशीही चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

नितीन करीर यांच्याकडे जरी मुख्य सचिवपद आलं असलं तरी ते फार काळ या पदावर राहू शकणार नाहीत, कारण ते 31 मार्च 2024 रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्याकडे केवळ तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर या महत्त्वपूर्णपदासाठी सुजात सौनिक यांच्या नावाचीही चर्चा आहे.

Nitin Karir
ACB Action News: महसूल विभाग लाचखोरीत राज्यात अव्वल; वर्षभरात तब्बल 'एवढे' गुन्हे दाखल

याचबरोबर पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळही पूर्ण झाल्याने ते आज निवृत्त होत आहेत. त्यामुळे महासंचाकल पदाचा तात्पुरता कारभार विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पोलीस महासंचालक पदासाठी रश्मी शुक्ला यांचे नाव प्राधान्याने चर्चेत आहे, कालतर काही वृत्तवाहिन्यांनी रश्मी शुक्ला यांची महासंचालक पदावर नियुक्ती झाल्याचेही जाहीर केले होते. मात्र प्राप्त माहितीनुसार रश्मी शुक्ला(Rashmi Shukla) या पदासाठी इच्छून नसून, मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी प्रयत्नशील आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com