Sanjay Raut : 'उद्धव ठाकरे उद्या नागपुरात मोठा राजकीय बॉम्ब फोडणार'

Sanjay Raut News : उद्या नागपुरात राजकारण तापण्याची शक्यता
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट देखील जोरदार प्रतिउत्तर देण्याची शक्यता आहे.

कारण आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपण उद्या उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नागपुरात जाऊन मोठा बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापण्याची शक्यता आहे. संजय राऊत आज एका कार्यक्रमादरम्यान नवी मुंबईत (Mumbai) बोलत होते.

Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : "चंद्रकांत दादांवर फडणवीसांनी ठरवून ट्रॅप टाकण्याचा डाव आखला!"

यावेळी संजय राऊत म्हणाले, ''फेब्रुवारी पर्यंत काय करायचे ते करून घ्या. नंतर तुम्ही राहणार नाही. हे सरकार अलिबाबा चालीच चोर आहे. पण लवकरच अलिबाबा जाणार आणि चाळीस चोरही. त्यानंतर पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार आणि ते देखील उद्धव ठाकरेच असतील. मला तुम्ही तुरुंगात टाकलं. तुम्हाला वाटलं तुरुंगात टाकल्यावर गप्प बसेल, पण नाही हा कट्टर शिवसैनिक आहे दबणार नाही'', असं म्हणत शिंदे गट आणि भाजपला राऊतांनी सुनावलं.

''तुम्ही मला ज्या तुरुंगात ठेवलं. त्याच तुरुंगात आणि त्याच खोलीत तुम्हाला देखील ठेवणार आहे. आम्ही फायली देखील तयार करून ठेवल्यात. आम्ही बदला घेतल्या शिवाय शांत बसणार नाही. तुम्ही पाठीत खंजीर खुपसला. पण आम्ही पुढून खंजीर खुपसणार आहोत, असं म्हणत त्यांनी शिंदे गट आणि भाजपला (BJP) थेट इशाराच दिला.

Uddhav Thackeray
ग्रामपंचायतमधील मोठ्या यशानंतरही आमदार गोगावलेंनी केली कार्यकर्त्यांची कानउघाडणी

''उद्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर नागपुरात जाऊन मोठा बॉम्ब फोडणार आहे, वाघाचे काळीज असलेला हा शिवसैनिक आहे. तो तुम्हाला पेलणार नाही. ही जमलेली गर्दी खोके देऊन जमवलेली नाही. इकडे सगळे ओके आहे, मात्र तिकडे मात्र फक्त खोकेच आहेत, असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उद्या नागपुरात (Nagpur) कोणता नवा बॉम्ब फोडणार याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com