अन्वय नाईक आत्महत्या अन् पोलिसांच्या बदल्यांवरून देशमुखांची झाडाझडती

चांदीवाल समितीसमोर सचिन वाझेच्या वकिलांनी आज अनिल देशमुखांची उलटतपासणी घेतली.
Anil Deshmukh and Sachin Waze
Anil Deshmukh and Sachin WazeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या वकिलांनी आज देशमुखांची उलटतपासणी घेतली आहे. यात अनेक प्रश्नांवर देशमुखांची झाडाझडती घेण्यात आली.

वाझेचे वकीलांनी देशमुखांची अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणासह पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर उलटतपासणी घेतली. देशमुखांची आज झालेली उलटतपासणी पुढीलप्रमाणे :

वकील - अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी तुम्ही सीआयडीला तपासाचा आदेश दिला होता का?

देशमुख - सीआडीच्या अधिकाऱ्यांना मी आदेश दिले होते. त्यांनी आधी चौकशी झाल्याचे कळवून पुन्हा चौकशी करण्याची गरज नसल्याचे सांगितले. या तपासाबाबत मी समाधानी नव्हतो. कारण त्या प्रकरणात व्यवस्थित चौकशी झाली नव्हती. यामुळे मी पुन्हा चौकशीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

वकील - कोणत्या अधिकाऱ्यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पुन्हा चौकशीची गरज नसल्याचे सांगितले?

देशमुख - मला आठवत नाही.

वकील - सप्टेंबर महिन्यात सहपोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे यांची नियुक्ती ही वाझेच्या नियुक्तीपूर्वी करण्यात आली होती.

देशमुख - मला आठवत नाही.

वकील - मिलिद भारंबे सहआयुक्त असताना सीआययूचे अधिकारी म्हणून वाझेने त्यांना रिपोर्ट करायला हवे.

देशमुख - नियमानुसार करायला हवे.

वकील - सचिन वाझे हे प्रोटोकॉल पाळत नाहीत, अशी तक्रार भारंबेंनी कधी केली होती का?

देशमुख - गेल्या वर्षी ३० मार्चला आलेल्या अहवालापूर्वी मला कोणतीही तक्रार आलेली नव्हती.

वकील - अन्वय नाईक प्रकरणाची चौकशी व फेक मास्क प्रकरणात तांत्रिक चौकशीसाठी वाझेची मदत घेतली होती का ?

देशमुख - सचिन वाझेला मी चेहऱ्याने आणि नावानेही ओळखत नव्हतो.

वकील - पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या तुमच्या अधिकारात येतात का?

देशमुख - काही बदल्या माझ्या अधिकारात येतात, काही मुख्यमंत्री व माझ्या अधिकारात येतात तर काही पोलीस महासंचालकांच्या अखत्यारीत येतात.

Anil Deshmukh and Sachin Waze
असंही राजकारण; पत्नी भाजपमध्ये गेल्यानं काँग्रेसच्या आमदाराचा पत्ता कट?

दरम्यान, सचिन वाझेने मुंबईचे पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना चौकशीसाठी बोलवण्यात यावे, असा अर्ज केला होता. या अर्जाला देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील संवादाविषयी परमबीरसिंह यांनी सादर केलेला व्हॉटसअॅपवरील मजकूर आणि परमबीरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे जाहीर केलेले आरोप याच्या परस्पर संबंधांची शहानिशा चांदीवाल समिती करीत आहे.

Anil Deshmukh and Sachin Waze
शहांची राज्यसभा अन् राज्यपालपदाची ऑफर धुडकावून माजी मुख्यमंत्री विधानसभेवर ठाम

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या सर्व आरोपांची चौकशी चांदीवाल समिती करीत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com