Sanjay Pandey : माजी DGP संजय पांडे लोकसभेच्या रिंगणात ; मुंबईत 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार!

Sanjay Pandey contest ok Sabha election : खासदारकी लढणारे संजय पांडे हे मुंबईचे दुसरे माजी पोलिस आयुक्त; आपल्या कामाची त्रिसूत्री ही जाहीर केली.
Sanjay Pandey
Sanjay PandeySarkarnama

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील शेवटच्या (पाचव्या) टप्यात 20 मे रोजी मतदान असलेल्या उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राज्यातील मतदानाचे दोन टप्पे झाले,तरी आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जाहीर झाले नव्हते.अखेर परवा आणि काल त्यांची घोषणा झाली.आघाडीने माजी मंत्री आणि धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड, तर युतीने प्रसिद्ध वकील उज्जवल निकम यांना तिकिट दिले. त्यानंतर आता तेथे राज्याचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी)संजय पांडे यांची एंट्री झाली असून अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

डीजीपी होण्यापूर्वी संजय पांडे(Sanjay Pandey) हे मुंबईचे पोलिस आय़ुक्त होते. त्यांच्या रुपाने दुसरे मुंबईचे दुसरे माजी पोलिस आयुक्त आता लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. यापूर्वी डॉ.सत्यपालसिंह यांनी 2014 ला स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली अन् भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना लगेच उत्तरप्रदेशातील बागपत या आपल्या मूळगाव असलेल्या जिल्ह्यातून 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजितसिंह यांचा पराभव केला. त्याचे बक्षिस म्हणून त्यांना केंद्रात राज्यमंत्री करण्यात आले. 2019ला ते दुसऱ्यांदा खासदार झाले.पण, आता 2024 ला,मात्र त्यांना थांबविण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Pandey
Sarode Question to Nikam : सर, हरणारी केस आपण का घेतली? : ॲड सरोदेंचा निकमांना भाजपच्या उमेदवारीवरून खोचक सवाल

पांडे आणि डॉ. सत्यपालसिंह यांच्यात एक साम्य आहे. दोघांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यात सत्यपालसिंहाना यश आले. ते खासदार झाले. तर,व्हीआरएस घेतल्यानंतर 2004 ला कॉंग्रेसने मध्य मुंबईतून पांडे यांना उमेदवारी न दिल्याने ते पुन्हा सेवेत आले. मुंबईचे सीपी आणि राज्याचे डीजीपी झाले. तेथून निवृत्त झाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला आहे.

कुठल्याच पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष लढत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजसेवेची संधी मिळत असल्याने ही निवडणूक लढत आहे, असे ते म्हणाले. तसेच लोकांनी संधी दिली,तर सॅनिटेशन, हॅबिटेशनआणि एज्युकेशन ही आपल्या कामाची त्रिसूत्री राहणार असल्याचे पांडे म्हणाले.

Sanjay Pandey
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रिंगणात वर्षा गायकवाडांना टक्कर देणारे उज्वल निकम कोण?

मुंबईतील मतदार हा शिक्षित असल्याने ते राजकीय पक्षाच्या पलिकडे जाऊन विचार करतात पाहू असे ते म्हणाले. काऱण निवडणुकीत खर्चासाठी आपल्याकडे पैसे नाहीत,असे त्यांनी सांगितले. सुशिक्षीत उमेदवार हा बदल घडवू शकतो. त्यामुळे आता मतदारांना ठरवायचे आहे की राजकीय पक्ष की सुशिक्षित उमेदवार, असे ते म्हणाले. 2014 ला कॉंग्रेसने त्यांना मध्य मुंबईतून उमेदवारी नाकारून ती एकनाथ गायकवाड यांना दिली होती.आता त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड या उत्तर-मध्य मुंबईतील कॉंग्रेस म्हणजे आघाडीच्या उमेदवार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com