Ujjwal Nikam-Asim Sarode
Ujjwal Nikam-Asim Sarode Sarkarnama

Sarode Question to Nikam : सर, हरणारी केस आपण का घेतली? : ॲड सरोदेंचा निकमांना भाजपच्या उमेदवारीवरून खोचक सवाल

North-Central Mumbai Constituency : आता लोकांशी संवाद साधतांना गोलमोल, गुळमुळीत बोलून चालणार नाही. लोकांनी मोदींचा खोटेपणा आता कुठे ओळखला आणि तरीही, तुम्ही त्यांच्यात सामील झालात, असा सवाल ॲड सरोदेंनी निकमांना केला आहे.
Published on

Lok Sabha Election 2024 : उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या (कॉंग्रेस) उमेदवार म्हणून वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा ता. 26 एप्रिल रोजी झाली. त्यानंतर शनिवारी (ता. 27 एप्रिल) महायुतीने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे नाव जाहीर केले. ते मूळचे जळगावचे असून गायकवाड याही मतदारसंघाच्या बाहेरच्या आहेत. पण, त्या मुंबईतीलच धारावीच्या आमदार आहेत. त्यामुळे तेथे कोण जिंकणार बाहेरचा पण जवळचा असलेला की दूरचा अशी खमंग चर्चा आता रंगली आहे.

वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा असून संपूर्ण मुंबईतील त्यांचा वावर आणि परिचय ही बाब त्यांच्या पथ्यावर पडणारी आहे. मायावीनगरीतील सेलिब्रिटी राहत असलेल्या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील सहापैकी चार आमदार महायुतीचे असून ही ॲड. निकमांची (Ujjwal Nikam ) जमेची बाजू आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) हे या उत्तर मध्य मुंबईत मोडणाऱ्या वांद्रे (पश्चिम) मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची लढत आहे. एकूणच तेथे कॉंग्रेस आणि भाजपचे मुंबई अध्यक्षच भिडणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ujjwal Nikam-Asim Sarode
Manoj Jarange Solapur Tour : मोदी, ठाकरे, पवारांनंतर मनोज जरांगेही सोमवारी सोलापुरात; कोणाला पाडायचा संदेश देणार?

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत मावळ मतदारसंघात स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा प्रचाराचा मुख्य मुद्दा निकालात निर्णायकी ठरला होता. त्यामुळे तेथे शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मतदारसंघातील (पिंपरी-चिंचवडकर), तर राष्ट्रवादीचे पार्थ पवार हे बाहेरचे (बारामतीकर) उमेदवार होते. पार्थ हे पवार कुटुंबातील सदस्य असूनही ते स्थानिक नसल्याचा जोरदार फटका त्यांना बसला आणि पहिल्यांदाच पवार कुटुंबातील सदस्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. तसाच काहीसा प्रकार वायव्य मुंबईत घडू शकतो. तेथेही स्थानिक विरुद्ध बाहेरचा, असा प्रचार झाला तर तो कळीचा मुद्दा ठरू शकतो.

इथे मनं जिंकावी लागतात? : निकमांना सरोदेंचा टोला

ॲड. उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीचे ‘निर्भय बनो’चे असीम सरोदे यांनी उपरोधिक स्वागत केले आहे. ॲड. उज्ज्वल निकम सर तुमचे जनतेच्या न्यायालयात स्वागत! या न्यायालयात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो, इथे मनं जिंकावी लागतात आणि लोकांची त्वरित येणारी प्रतिक्रिया 'जेव्हढे विचारले तेवढेच बोला' असे म्हणून थांबविणे लोकांच्या न्यायालयात चालत नाही, असा टोला त्यांनी निकम यांना लगावला आहे. आपण अनेक खटल्यांत गुन्हेगारांना शिक्षा देण्यात यश मिळवले. जरी कुणी अजून तशी माहिती दिलेली नाही, तरी पण काहीही फी न घेता गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठीसुद्धा तुम्ही काम केले असेल असे समजू, असेही खोचकपणे त्यांनी निकमांना सुनावले आहे.

Ujjwal Nikam-Asim Sarode
Abhijeet Patil News : सोलापुरात मोठी घडामोड; पवारांचे विश्वासू अभिजित पाटील सोलापुरात आज फडणवीसांना भेटणार

मूळचे अमरावतीचे पण आता पुणेकर झालेले ॲड सरोदे यांनी पुणेरी भाषेतच ॲड. निकमांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. सर तुम्हाला माहिती आहे की, आता लोकांशी संवाद साधतांना गोलमोल, गुळमुळीत बोलून चालणार नाही. लोकांनी मोदींचा खोटेपणा आता कुठे ओळखला आणि तरीही, तुम्ही त्यांच्यात सामील झालात, असा सवाल ॲड सरोदेंनी निकमांना केला आहे.

सर, अनेकदा तुम्ही केसची कागदपत्रे, चार्जशीट बघून हरणारी केस घेणे नाकारले आहे. मोदींचा नाकर्तेपणा, धर्मांधता, वाढती महागाई, भ्रष्टाचारी, लोकशाहीविरोधी आता लोकांनी स्पष्टपणे ओळखले आहे. या वेळी मोदींना हरवायचे असा चंग लोकांनी बांधला आहे, तेव्हा ही हरणारी केस आपण का घेतली, याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

Ujjwal Nikam-Asim Sarode
Nashik Lok Sabha Constituency : शिवसेना म्हणते, 'शांतिगिरी महाराजांनी निवडणुकीतून माघार घ्यावी'

मोदींनी लोकशाही यंत्रणांचा भरमसाठ गैरवापर केला. अगदी पोलिसच नाही तर न्यायव्यस्थेचा गैरवापर केला. पण, तुम्ही त्यावर काहीच बोलले नाही, तरीही आम्ही तुम्हाला नेहमीच विशेष समजत आलो. असे असूनही तुम्ही नक्की या लोकशाही प्रक्रियेतून जाण्याचा अनुभव घ्या आणि जेव्हा लोकांमधील सत्याचा दाह तुम्हाला जाणवेल, त्यातून कदाचित स्वतः भोवती मोठेपणाचे स्वतःच तयार केलेले काल्पनिक मुखवटे गळून पडलेला एक खरा वकील-माणूस आम्हाला भेटेल, असे काटेरी शब्द सरोदे यांनी निकमांबाबत आपल्या फेसबुक पोस्टमध्ये वापरले आहेत. तसेच उत्तर-मध्य मुंबईत निर्भय बनो सभा घेणार असल्याचे सांगत सर, ‘ये पब्लिक है, ये सब जानती है’ याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल, असा इशाराही सरोदेंनी निकमांना दिला आहे.

Edited By : Vijay Dudhale

Ujjwal Nikam-Asim Sarode
Madha Lok sabha : फडणवीस माढ्यात ॲक्टिव्ह; काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांना अकलूजमध्ये भेटणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com