हेमंत पवार
Balasaheb Patil News : माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. रिसवड (ता. कऱ्हाड) येथील कार्यक्रमात आमदार पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बाळासाहेब पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार हे नियमबाह्य सरकार आहे. तो लढा न्यायालयात सुरु आहे, त्यांच्यावर सातत्याने टांगती तलवार असल्यामुळे त्यांच्यासमोरही तो प्रश्न आहे. त्यातून त्यांना जनतेचा पाठिंबा मिळेल अशी याची खात्री नाही. त्यामुळे निवडणुका लांबवण्याचे काम त्यांच्याकडुन सुरु आहे,"
"सरकारने निवडणुका लवकर झाल्या पाहिजे, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. मात्र ही मंडळी न्यायालयात जावून त्यांच्याकडून वेळ मागून घेत आहेत. त्यामुळे निवडणुका होवू नयेत अशी शिंदे-फडणवीस यांची भुमिका दिसत आहेत," असे बाळासाहेब पाटील म्हणाले.
ते म्हणाले, "मंत्रीमंडळचा विस्तार अजूनही केली जात नाही. एक मंत्री दोन-तीन खात्यांना न्याय देवू शकत नाही. प्रशासन सुस्त झाले आहे. त्याचा परिणाम विकास कामावर झाला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे चालणार नाही,"
"भारत गोगावले, संजय शिरसाठ हे शिंदे गटातील आमदार आपण मंत्री होणार असल्याचे सांगत आहेत.हा अधिकार सर्व मुख्यमंत्र्यांचा असतो. भाजप शिंदे गटाला बाहेरून पाठिंबा देईल असे वाटत होते. पण शिवसेनेतून फुटून गेलेल्या 50 आमदारांना मंत्रिपद मिळणार असे सांगितले जात होते. परंतु, तसे काय होत नसल्याने आता या आमदारांच्या अस्वस्थता आहे," असे बाळासाहेब पाटील म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.