NCP News : राजेंद्र शिंगणेंच्या प्रवेशाचा 'तो' फोटो ट्विट करत अजित पवार गटाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चिमटा

Rajendra Shingne joins NCP Sharad Pawar Party : मागील काही दिवसांपासून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी तुतारी हाती घेत या चर्चांना पूर्णविराम दिला.
Rajendra Shingne joins NCP Sharad Pawar Party, Ajit Pawar
Rajendra Shingne joins NCP Sharad Pawar Party, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rajendra Shingne joins NCP SP : मागील काही दिवसांपासून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी तुतारी हाती घेत या चर्चांना पूर्णविराम दिला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, नुकतेच भाजपमधून (BJP) शरद पवार गटात आलेले हर्षवर्धन पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे देखील उपस्थित होते.

राजेंद्र शिंगेणे यांच्या याच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंगणे यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे.मिटकरी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शिंगेणे यांच्या पक्षप्रवेशाचा फोटो पोस्ट केला आहे.

Rajendra Shingne joins NCP Sharad Pawar Party, Ajit Pawar
Vijaysinh Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही विजयदादांना मानाचे पान...

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, 'आणि अखेर त्यांनी "जनहितार्थ" प्रवेश मिळविला. यावेळी राष्ट्रवादीचे माजी दोन दिग्गज नेते जे शांत झोप लागावी म्हणून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आणि नुकतेच भाजपमधून तुतारी गटात आले ते श्री विजयसिंह मोहिते पाटील आणि श्री हर्षवर्धन पाटील आवर्जून उपस्थित होते. #करेक्टकार्यक्रम.' अशा शब्दात त्यांनी राजेंद्र शिंगणे यांच्यासह फोटोत दिसणाऱ्या हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांवर निशाणा साधला.

तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी थेट शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्याचा दाखला देत शरद पवार (Sharad Pawar) गटाला डिवचलं आहे. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं की, "साहेब म्हणाले होते अजित दादांसोबत गेलेल्या लोकांसाठी परतीचे दोर कापले आहेत.

दादांसोबत आलेल्या शिंगणे साहेबाला सोबत घेऊन साहेबांनी बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून दिले या भावना पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या आहेत." असं म्हणत त्यांनी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना डिवचलं आहे.

शिवाय अजित पवारांसोबत गेलेल्यांना परत पक्षात घेतलं जाणार नाही, या शरद पवारांच्या वक्तव्याची त्यांनी आठवण करून दिली आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी केलेल्या टीकेला आता शरद पवार गटातील नेते काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com