Ravindra Phatak : आहेत 'माजी' तरी म्हणवून घेतात 'आजी,' रवींद्र फाटकांची चलाखी

Ayodhya Ram Mandir : माजी आमदार रवींद्र फाटकांचा बॅनरवर 'आमदार' असा उल्लेख...
Ravindra Phatak
Ravindra PhatakSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर

Thane Political News :

अयोध्येत रामाच्या मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने ठाणे शहरात विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपनेते, तसेच माजी आमदार रवींद्र फाटक यांचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

रवींद्र फाटक (Ravindra Phatak) हे माजी आमदार आहेत. तरीही ते बॅनरवर आमदार म्हणून मिरवत असल्याचे दिसून येते. ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्याच्या आमदारकीचा कालावधी संपून गेला आहे. तरीही ते नावाअगोदर आमदार लावत असल्याने ठाणे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Ravindra Phatak
BJP Politics : भाजपचं लक्ष्य, निवडणुकीआधी ठाकरेंचा बंदोबस्त

ठाणे (Thane) शहराला बॅनरबाजी काही नवीन नाही. त्यातच अयोध्येतील (Ayodhya) रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे शहरात आणखी बॅनरबाजीला ऊत आल्याचे दिसत आहे. शहरातील प्रमुख चौक, नाक्यांवर राजकीय पक्षाचे बॅनर्स झळकत आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांचेही शहरात विविध ठिकाणी बॅनर लागल्याचे दिसत आहे.

त्या बॅनर्सवर 'बाळासाहेबांचे स्वप्न साकार' असे नमूद केले आहे. याशिवाय कोट्यवधी रामभक्तांची इच्छापूर्ती आणि जय श्रीराम असे नमूद करताना 22 जानेवारीला रघुनाथनगर येथे होणाऱ्या मंदिरातील महाआरतीचा उल्लेख केला आहे. मात्र हे बॅनर्स लावताना त्यांना किंवा त्या कार्यकर्त्यांना माजी आणि आजीमधील फरक समजला नाही का? त्यामुळे याला अज्ञान म्हणायचं की आणखी काय, असाच प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. यानिमित्ताने रवींद्र फाटक यांनी पुन्हा एकदा आमदारकीची इच्छा व्यक्त केल्याचीही चर्चा ठाण्यात सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोण आहेत रवींद्र फाटक?

रवींद्र फाटक हे दिवंगत आनंद दिघे यांचे शिष्य. दिघे यांच्या निधनानंतर जेव्हा नारायण राणे यांनी काँग्रेसप्रवेश केला तेव्हा फाटक यांनीही राणेंना साथ दिली होती. ते वागळे इस्टेटच्या रघुनाथनगर येथून ठाणे महापालिकेत काँग्रेसच्या उमेदवारीवर नगरसेवक झाले होते. याचदरम्यान त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आणि ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. त्या आमदारकीचा कार्यकाळ काही महिन्यांपूर्वी संपला आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Ravindra Phatak
Shiv Sena MLA Pratap Sarnaik : ठाण्यात मतांसाठी 'साखर' पेरणीचा 'प्रताप'?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com