Pratap Sarnaik
Pratap SarnaikSarkarnama

Shiv Sena MLA Pratap Sarnaik : ठाण्यात मतांसाठी 'साखर' पेरणीचा 'प्रताप'?

Ayodhya Ram Mandir : प्रताप सरनाईक वाटणार 51 हजार किलो साखरेचा महाप्रसाद
Published on

पंकज रोडेकर

Thane News :

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. या निमित्ताने ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील रामभक्तांचे तोंड गोड करण्याची शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. ते प्रत्येकाला एक किलो याप्रमाणे तब्बल 51 हजार किलो साखरेचे महाप्रसाद म्हणून वाटप करणार आहेत. ही एकप्रकारे मतांसाठी 'साखर पेरणी' असल्याची चर्चा सध्या ठाण्यात सुरू झाली आहे.

Pratap Sarnaik
Ravindra Chavan : चेक्सचा शर्ट, चव्हाण आणि चेकमेट...!

अयोध्येतील (Ayodhya) श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भारतीयांसाछी ऐतिहासिक क्षण आहे. हा क्षण ठाणेकरांना अनुभवता यावा साठी कासारवडवली श्रीराम मंदिरासह उपवन तलाव या ठिकाणी महाआरती करण्यात येणार आहे. यासाठी उत्तर प्रदेशच्या जबलपूरमधून खास 11 पुरोहित बोलावण्यात आले आहे.

अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर जशी महाआरती केली जाते. आरती करणारे तेच ब्राम्हण आणि तसेच मोठे दिवे आरतीसाठी ठाणे (Thane) शहरात महाआरतीच्या ठिकाणी आणण्यात येणार आहेत. तसेच तब्बल 51 हजार किलो साखर महाप्रसाद म्हणून वाटली जाणार आहे. त्याचबरोबर महाआरतीच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात येणार असून उपवन येथे म्युझिकल फाऊंटनचा आनंद ठाणेकरांना घेता येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह दृश्ये स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहेत. महाआरतीच्या ठिकाणी ठाणेकरांना दीपोत्सव साजरा करता येणार आहे. याचदरम्यान, श्री राम नाम संकीर्तन आहे. शोभा यात्रेत श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचा पेहराव परिधान केलेल्या कलावंतांचा समावेश असेल. तसेच फटाके फोडून, ढोल ताशे वाजवून, पेढे वाटून आनंद साजरा करणार, असे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले.

22 लाखांचा महाप्रसाद

सध्या किरकोळ बाजारात साखरेचा दर 44 रुपये किलो आहे. त्याप्रमाणे 51 हजार किलो साखरेचा खर्च 2 लाख 44 हजार रुपये आहे. प्रसाद म्हणून प्रत्येकाला एक किलो साखर दिली जाणार आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे याला 'साखर पेरणी' का म्हणून नये, अशी प्रतिक्रिया काही ठाणेकरांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिल्या.

(Edited by Avinash Chandane)

Pratap Sarnaik
Mankoli Bridge : माणकोली पूल ठरणार निवडणुकीचा मुद्दा, विरोधक करणार विजयाचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com