Vishwanath Mahadeshwar Death News : ठाकरे गटावर शोककळा;मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

Uddhav Thakceray Shivsena : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
Vishwanath Mahadeshwar Death News
Vishwanath Mahadeshwar Death News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai: मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ६३ व्या अखेरचा श्वास घेतला. महाडेश्वर यांना मंगळवारी पहाटे दोन वाजता हृदयविकाराचा झटका आला. महाडेश्वर यांच्या आकस्मिक निधनामुळे ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.

विश्वनाथ महाडेश्वर(Vishwanath Mahadeshwar) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी मार्च 2017 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत मुंबईचे महापौरपद भूषवले होते. त्यांनी नागरिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. विश्वनाथ महाडेश्वर २००२ मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. मुंबईतील सर्वात उच्चशिक्षित नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख होती.

Vishwanath Mahadeshwar Death News
Prakash Ambedkar : मोदींवरही तुरुंगात जाण्याची वेळ येईल; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

विश्वनाथ महाडेश्वर हे मागच्या आठवड्यात गावाला होते. तिथून महाडेश्वर यांना मुंबई येऊन चार दिवस झाले होते. मात्र, मंगळवारी रात्री त्यांना ज्यावेळी त्रास जाणवू लागला.त्यावेळी त्यांना तात्काळ व्ही एन देसाई या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतू,उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. ह्दयविकाराच्या झटक्याने महाडेश्वर यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

महाडेश्वर यांचं दुपारी दोन वाजता पार्थिव राजे संभाजी विद्यालय, सांताक्रूझ(पूर्व) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता विश्वनाथ महाडेश्वर यांची अंत्ययात्रा निघेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे दुपारी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अकाली निधनाने ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.

आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांची मुलगी रात्री लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली होती. यावेळी तिला वडील महाडेश्वर बेशुद्ध पडलेले दिसले. त्यानंतर त्यांना व्हीएन देसाई रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती विश्वनाथ महाडेश्वर यांचे नातेवाईक परशुराम तानावडे यांनी दिली आहे.

Vishwanath Mahadeshwar Death News
Z S Poonawalla: ईडीची मोठी कारवाई; झेड.एस.पूनावालांची 41 कोटींची मालमत्ता जप्त

महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi) सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्या मारहाण प्रकरणी महाडेश्वर यांना अटक झाली होती.अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ऋतुजा लटके यांचा पालिकेतून राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी महाडेश्वरांनी विशेष प्रयत्न केले होते. लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसताना अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी विश्वनाथ महाडेश्वर यांच देखील नाव चर्चेत होते.

राजकीय कारकीर्द

2002 - मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले

2003- शिक्षण समितीचे अध्यक्ष

2007 - पुन्हा नगरसेवक म्हणून निवड

2012- तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवड

मार्च 2017 ते नोव्हेंबर 2019 - महापौर म्हणून निवडून आले

मुंबईतील सर्वात उच्चशिक्षित नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख होती

विश्वनाथ महाडेश्वर यांची राजकीय प्रवासही उल्लेखनीय होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com