
Maharashtra Politics : अलीबाबा आणि चाळीस चोरांचे हे सरकार अल्पायुचे आहे. सरकार विस्तार होणार नाही. ते होण्यापूर्वीच हे सरकार कोसळणार आहे. शिवसेना पक्ष फुटीला कारणीभूत ठरलेल्या ४० आमदारांनी सरकार स्थापन केले नाही तर राजकीय 'व्हीआरएस' घेतली आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह घेण्यासाठी त्यांचा वापर केला गेलाय. मुंबईत झालेल्या विविध कामांचे पुन्हा टेंडर काढले जातात. त्यामुळे आता हे इडीचे नसून बीसी (बिल्डर आणि काँट्रॅक्टर) सरकार झाले आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
वरळी जांभोरी मैदानावर ठाकरे गटाचा निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी सरकारला हलवून टाकणार असल्याचा निर्धार ठाकरे यांनी केला. ते सतत दिल्लीकडे काहीतरी मागत असतात. आता ते ठाकरे आडनाव मिळेल का, अशी विचारणा करीत असतील, असा टोला ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) लागावला.
महाविकास आघाडीने बीडीडी चाळीचे २५ वर्षांच्या स्वप्नांची पूर्ती केली. कोविड काळात केलेल्या कामाने देशाला दिशा देण्याचे काम केले. त्यासह आमच्या काळात वरळीत केलेल्या कामांवर सध्याच्या सरकारचा डोळा आहे. येथील केलेल्या कामांची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला जातो. जांभोरी मैदानाचीही वाट लावली आहे.
अनेक कामांसाठी मोठे कटआऊट लावून श्रेय घेतले जात आहे. आघाडीच्या काळात मुंबई (Mumbai) जपली. राज्य पुढे नेण्याचे काम केले. आजचे सरकार मात्र राज्याला दिल्लीपुढे झुकविण्याचे काम करीत असल्याचा हल्लाबोलही आदित्य यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.