Pune Bypoll Election : चिंचवडमध्ये 50 टक्के मतदान; काय सांगते आकडेवारी?

Chinchwad By-Election: अनेकांना मतदान करता आले नसल्याने टक्केवारीवर परिणाम
Voters in Chinchwad
Voters in ChinchwadSarkarnama
Published on
Updated on

By Election : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नाना काटे तर ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष राहुल कालटे अशी तिरंगी लढत झाली.

दरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीकडून राज्यातील बड्या नेत्यांनी प्रचार केल्याने चिंचवडचे वातावरण चांगलेच ढवळले होते. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता होती. मात्र तसे झाल्याचे दिसून आले नाही.

Voters in Chinchwad
Budget : विरोधक सरकारला घेरणार?; अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'हे' मुद्दे गाजणार!

चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदार संघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. या मतदार संघात पाच लाख 68 हजार 954 मतदार आहेत. आता पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान चिंचवडमध्ये 2009 मध्ये 50.53 टक्के, 2014 मध्ये 56.30 टक्के, तर 2019 मध्ये 53.66 टक्के मतदान झाले होते. पोटनिवडणुकीत मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Voters in Chinchwad
Budget Session : शिवसेनेने ठाकरे गटाच्या 15 आमदारांना बजावला व्हीप; न्यायालयीन संरक्षणाचं काय?
Chinchwad Voting
Chinchwad VotingSarkarnama

चिंचवडमध्ये भाजप, राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह एकूण २८ जण आपले नशीब आजमावत आहेत. दरम्यान सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाली होती. सकाळ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानास संथ प्रतिसाद दिसून आला. मात्र दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्राबाहेर लांब रांगा लावल्याचे दिसून आले.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान झाले. त्यातील पहिल्या टप्प्यात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 3.52 टक्के, सकाळी 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत 20.68 टक्के, दुपारी तीन वाजेपर्यंत 30.55 टक्के सायंकाळी पाच वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 41.1 टक्के मतदान झाले होते.

Voters in Chinchwad
By Electon : वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर ठरविणार चिंचवडचा नवीन आमदार कोण?

आमदार लक्ष्मण जगातप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर महिन्यातच ही निवडणूक जाहीर झाली. भाजपने सुरूवातील ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोधकांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान भाजपने आमदार जगताप यांच्या कुटुंबातील उमेदवार दिला. तर महाविकास आघाडीतून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवार ठरण्यास वेळ लागला. अखेर राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंड पुकारले. त्यामुळे चिंचवडमधील निवडणूक रंगतदार होणार याची प्रचिती आली होती.

Voters in Chinchwad
G-20 News : महिलांच्या आर्थिक सबलीकरणाची शिफारस करणार

चिंचवडमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीकडून बड्या नेत्यांनी प्रचार केला. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचार केला.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे अदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, भास्कर जाधव या नेत्यांनी तोफ डागली. महाविकास आघाडीचे सरकार पडल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

Voters in Chinchwad
Marathwada News : उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी प्रतिष्ठेच्या निवडणुकीत विजय खेचून आणला : मराठवाड्यात पुन्हा गड राखला

जगताप-कलाटेंच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट

चिंचवडची मतदान प्रक्रिया एक घटना वगळता शांतते पार पडली. दरम्यान सकाळच्या सत्रात येथे दोन गटात धक्काबुक्की झाली. अपक्ष उमेदवार कलाटे आणि जगताप यांच्या समर्थकांमध्ये हा वाद झाला होता. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटला. त्यानंतर येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com