Gajanan Kirtikar : गजानन कीर्तीकरांचे दोन दिवसांत दोन खळबळजनक दावे; नेमके काय म्हणाले?

Amol Kirtikar Vs Ravindra Waikar : कीर्तीकरांऐवजी मुख्यमंत्री शिंदेंनी वायकरांना उमेदवारी दिली. त्यावरून ऐन मतदानावेळीच कीर्तीकरांनी वायकरांना दोन महिन्यांचे प्रॉडक्ट असे संबोधले.
Gajanan Kirtikar
Gajanan KirtikarSarkarnama

Maharashtra Political News : शिवसेना फुटल्यानंतर माजी खासदार गजानन कीर्तीकरांनी सर्वात शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ देण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून रीतसर शिंदे गटात सहभागी झाले. पक्षात मोठी जबाबदारी किंवा लोकसभेची उमेदवारी मिळेल, असे वाटत असताना मात्र कीर्तीकरांवर निष्क्रिय राहण्याची वेळ आली. दरम्यान, आता कीर्तीकरांनी दोन दिवसांतच दोन सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक पार पडली. मुंबईतील सहा जागांसाठी सोमवारी (ता. 20) मतदान झाले. यात मुंबई उत्तर पश्चिममधून गजानन कीर्तीकरांचा मुलगा अमोल कीर्तीकर Amol Kirtikar हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेकडून तर शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांनी आपले नशीब आजमावले. मात्र मतदान सुरू असतानाच कीर्तीकरांनी शिंदे गटाचे म्हणजेच आपल्या पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकरांचा दोन महिन्यांचे प्रॉडक्ट असा उल्लेख केला.

शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांना Ravindra Waikar लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. ते दोन महिन्यांपूर्वीच शिंद गटात सहभागी झालले आहेत. दरम्यान, येथून कीर्तीकरांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे वडील विरुद्ध मुलगा असा सामना रंगणार, असेही बोलले जात होते. मात्र कीर्तीकरांऐवजी मुख्यमंत्री शिंदेंनी वायकरांना उमेदवारी दिली. त्यावरून ऐन मतदानावेळीच कीर्तीकरांनी वायकरांना दोन महिन्यांचे प्रॉडक्ट असे संबोधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gajanan Kirtikar
Medha Kulkarni News : 'होर्डिंग'प्रकरणात राजेंद्र भोसलेंच्या कारभारावर मेधा कुलकर्णी हसल्या अन् भडकल्याही !

त्यानंतर मंगळवारी (ता. 21) एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना कीर्तीकरांनी Gajanan Kiritkar पक्षात एकटा पडल्याचे विधान केले आहे. ते म्हणाले, अमोलला बोटाला धरून शिवसेनेत आणले. त्यांच्या प्रत्येक पावलाला साथ दिली. आता मात्र त्यांच्या आयुष्यातील मोठ्या निवडणुकीच्या वेळी त्याच्यासोबत नसल्याची खंत आहे. या मतदारसंघातील माझ्या संपर्काचा फायदा वायकरांना व्हायला हवा. निवडणुकीत मात्र मी ना अमोलच्या विरोधात काम केले ना वायकरांच्या बाजूने काम केले, असे म्हणत आता एकटा पडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

Gajanan Kirtikar
Shambhuraj Desai : शिंदे, फडणवीसांनंतर आता शंभूराज देसाई 'ॲक्शन मोड'वर, 'ते' दोन्ही पब सील!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com