Mayuti Politics : '...तर युतीला माझा विरोध', गणेश नाईकांनी रणशिंग फुंकले; एकनाथ शिंदेंना डिवचले!

Ganesh Naik Criticized Eknath Shinde : गणेश नाईकांनी थेट ठाणे महापालिका मी जिंकूण देऊ शकतो, असे म्हणत रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, असे म्हटले आहे.
Ganesh Naik vs Eknath Shinde
Ganesh Naik vs Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Ganesh Naik News : वरिष्ठ नेत्यांनी युतीचा आग्रह धरला आणि युतीत कार्यकर्त्यांचा सन्मान होत नसले तर पहिला विरोध मी करेन, अशी स्पष्टोक्ती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सेवा पंधरावडा निमित्ताने सेवा पंधरावडा निमित्ताने मंगळवारी भाजप कार्यालयात आयोजित बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री नाईक यांनी ठाणे पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

राज्यात शिवसेना - भाजप हातात हात घालून सत्ता हाकत असली तरी, दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात संघर्ष दिसून येत आहे. नवी मुंबई पालिकेवरही अनेकांचा डोळा आहे पण त्यांना मी उत्तर देणार आहे. वरिष्ठ नेते महायुतीबाबत निर्णय घेतील. पण, युतीत कार्यकर्त्यांचा सन्मान होत नसले तर मी कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यावेळी पहिला विरोध करणारा मी असेन, असे नाईक म्हणाले.

नवी मुंबई महापालिका निवडणुक प्रारुप प्रभाग रचनेवरून गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रभाग रचनेविरोधात चार हजाराहून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून त्या नाईक समर्थकांनी दाखल केल्याचे समजते. ठाण्याचा प्रभाव असलेल्या प्रभाग रचनेवरून अस्वस्थ असलेल्या नाईक यांनी याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला होता. या प्रकरणामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदे आणि नाईक संघर्ष आणखी वाढला आहे.

Ganesh Naik vs Eknath Shinde
Mumbai Crime News: तोतया आमदाराचा अजब फंडा! खासगी वाहनांवर 'आमदार' लोगो लावून सरकारला घातला गंडा

ठाण्यात सत्ता आणायची असेल तर...

नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली. ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो. पण, त्यासाठी रावणाच्या अंहकाराचे दहन करावे लागले. त्यासाठी तुम्ही तयार आहात का”, अशी विचारणा नाईक यांनी करताच त्याला पदाधिकाऱ्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला. त्यापूर्वी रावणाने अंहकार केला त्याचा नाश झाला, असे सांगत कुणीही अंहकार बाळगू नये, असा सल्ला देखील कोणाचेही नाव न घेता दिला.

Ganesh Naik vs Eknath Shinde
Jagdeep Dhankhar News : राधाकृष्णन विजयी होताच जगदीप धनखड यांनी धाडले पत्र; राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com