Ganesh Naik : गणेश नाईक महायुती मंत्रिमंडळात; भाजपच्या शुभेच्छा होर्डिंगवर बंडखोर संदीप अन् वैभव नाईकांची 'एन्ट्री'

Ganesh Naik in Mahayuti Government : मंत्रिमंडळात गणेश नाईक यांचा समावेश झाला असून, त्यानंतर नवी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी लावलेल्या शुभेच्छा फलकावर बंडखोर संदीप अन् वैभव नाईक यांचे फोटो झळकले आहेत.
Ganesh Naik
Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. आता त्यांना कोणते खाते मिळणार याची उत्सुकता आहे. मंत्रिमंडळातील समावेशानंतर नवी मुंबईतील त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार फलकबाजी केली असून, त्यावर विधानसभा निवडणुकीवेळी भाजपशी बंडखोरी केलेले संदीप नाईक आणि वैभव नाईक यांचे फोटो झळकले आहेत. यामुळे संदीप नाईक आणि वैभव नाईक यांची पुन्हा भाजपमध्ये एन्ट्री होणार, अशी चर्चा रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप नाईक यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघात संदीप नाईक यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात प्रवेश केला. भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात निवडणूक लढवली. नाईक पिता-पुत्रांनी वेगवेगळ्या पक्षातून निवडणुकीला विधानसभा निवडणुकाला समोरे गेले. गणेश नाईक यांनी भाजपमधून, तर संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवली.

Ganesh Naik
TOP Ten News - भुजबळांचा राष्ट्रवादी अन् महायुतीला पहिला झटका; ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाबाबत मोठी बातमी - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

संदीप नाईक यांच्या बंडखोरीवर गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली होती. गणेश नाईक यांचा विजय झाला, तर संदीप नाईक यांचा पराभव झाला. गणेश नाईक यांना भाजपकडून महायुती (Mahayuti) सरकारमध्ये मंत्रि‍पदाची संधी मिळाली. भाजपच्या नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी गणेश नाईक यांना मिळालेल्या मंत्रि‍पदावरून जल्लोष करत आहेत. नवी मुंबईत शुभेच्छा फलक लावले आहेत. मात्र या फलकांवर बंडखोर संदीप नाईक आणि वैभव नाईक यांचे छायाचित्र देखील लावले आहेत. यावरून बंडखोरांना भाजपमध्ये घरवापसीचे वेध लागले आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

Ganesh Naik
Winter Session 2024 Live Update : 'एक देश एक निवडणूक' विधेयक मंगळवारी संसदेत सादर केले जाणार

विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप नाईक यांच्यात लढत झाली. यात संदीप नाईक यांचा 377 मतांनी पराभव झाला. निवडणुकीदरम्यान भाजपने बंडखोरी करणारे उमेदवार व पदाधिकाऱ्यांना निलंबित केले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये भाजपमध्ये फूट पडली होती.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संदीप नाईक आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाढीसाठी कार्यक्रम, मेळावे घेतले नाहीत. यामुळे ते पुन्हा भाजपमध्ये येणार, अशी चर्चा सुरू होती.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गणेश नाईक यांना संधी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात गेलेल्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी विजयाचे होर्डिंग लावले असून त्याच्यावर गणेश नाईक, संजीव नाईक, सागर नाईक यांच्यासोबत संदीप नाईक आणि वैभव नाईक यांचीही छायाचित्रे आहेत. यामुळे घरवापसीच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. मात्र, याविषयी अद्याप कोणीही जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com