
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात (Drugs case) अटकेत असलेल्या आर्यन खान (Aryan Khan) गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून तुरुंगात आहे. अभिनेता शाहरुख खानने (Shahrukh Khan) गेल्या आठवड्यात आर्यनची भेट घेतली होती. त्यानंतर आता आर्यनची आई गौरी खानही (Gauri Khan) आर्यनला भेटणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून आर्यन आर्थर रोड जेलमध्ये (Arthar Road Jail) आहे. गौरीला आर्यनची खूप काळजी वाटत असल्याने ती मुलाला भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला सत्र न्यायालाने जामीन नामंजूर केल्यानंतर त्याच्या कोठडीत वाढ झाली. त्यानंतर त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात आर्यनच्या सुटकेसाठी याचिका दाखल केल्यानंतर आर्यनची जामीनावर लवकरात लवकर सुटका होण्यासाठी खान कुटुंबीय आणि वकिलांकडून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या आठवड्यात शाहरूख खानही तुरुंगात आपल्या मुलाला भेटायला आला होता. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाने त्याच्या कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
दरम्यान, शाहरुख खान २१ ऑक्टोबरला आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. जिथे त्याने आर्यनशी १५ ते २० मिनिटे चर्चा केली. संभाषणादरम्यान शाहरुख आणि आर्यन यांच्यामध्ये काचेची भिंत होती. यासोबत तुरुंग अधिकारीही उपस्थित होते. दोघेही इंटरकॉमद्वारे बोलले.
एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकून एनसीबीने आर्यनसह 8 जणांना अटक केली. तसेच मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठाही जप्त करण्यात आला. आर्यनचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आता त्याच्या वकिलांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
तर ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनन्या पांडेचे नाव समोर आले आहे. चॅटमध्ये दोघेही ड्रग्जबद्दल बोलल्याचे दिसत आहे. या माहितीच्या आधारे आता एनसीबी अनन्या पांडेची चौकशी करत आहे. एनसीबीने अनन्याला समन्स पाठवले होते, त्यानंतर सलग 2 दिवस तिची चौकशी करण्यात आली. आज पुन्हा अनन्याला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.