आर्यन खान प्रकरण तापणार; आघाडीसरकार-भाजप आमनेसामने

प्रभाकर साईलचा(Prabhakar) इंटरव्यू करण्यामागे महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या महान नेताचा अदृश्य हात कोणाचे
Ram Kadam- Sanjay Raut
Ram Kadam- Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drugs case) प्रभाकर साईलच्या (Prabhakar) इंटरव्यू करण्यामागे महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या महान नेताचा अदृश्य हात होता ? कोणत्या हॉटेलमध्ये कोणाच्या इशाऱ्याने इंटरव्यू झाला ? ड्रग्स माफियांना वाचवणे? हा उद्देश होता का? असे एक ना अनेक सवाल आता भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी उपस्थित केले आहेत. याशिवाय त्यांनी शिवसेना (Shivsne) आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला आहे.

Ram Kadam- Sanjay Raut
'कितीही त्रास दिला तरी आम्ही पुरुन उरु'

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात जसजसे नवनवीन खुलासे समोर येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. रविवारी (२४ ऑक्टोबर) ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओनंतर या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. ड्रग्ज प्रकरणातल्या मुख्य साक्षीदारांपैकी एक असलेल्या प्रभाकर साईलने एनसीबीने त्यांना कोऱ्या कागदावर सह्या करायला सांगितल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ज्यामुळे हे प्रकरण खुप तापणारअसल्याचे दिसत आहे. मात्र दुसरीकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळतही याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहेत.

भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर आरोप करत टिकास्त्र डागले आहे. ''हफ्ता वसूली निरंतर चालू रहावी म्हणुन NCB ला बदनाम करण्याचे एक षड्यंत्र होते ? प्रभाकरला धमकावून की लालच देऊन #वसूलीगेट किंवा ह्या षड्यंत्रात गुंतवले. प्रभाकरचा वर्त्तमान बॉस मंत्रालयात कितव्या माळ्यावर आहे ? असे अनेक सवाल राम कदम यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, मागील 22 दिवसात त्याच्या मोबाईल लोकेशनसहित तो कोणाच्या संपर्कात आला याची चौकशी CBI ने करावी, अशी मागणी या राम कदम यांनी केली आहे.

यासोबतच, जे उघडपणे ड्रग्स माफियांचे पहाडाप्रमाणे समर्थन करता आहेत, त्या महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा करणे निरर्थक आहे. म्हणुनच CBI ने याची चौकशी करावी, अन्यथा देशातील प्रमाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल, चौकशीनंतर महाराष्ट्र सरकारचे नेते या प्रकरणात एवढे रुची घेण्याचे कारण काय आणी प्रभाकरची संशयास्पद कलाटणी यामागचे सत्य देशासमोर लवकरच येईल, असेही राम कदमांनी म्हटलल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com