Gauri Palwe Death Case : गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात दमानियांची एन्ट्री; म्हणाल्या, 'दु:ख याचं होतंय की पंकजा मुंडेंनी हे कळाल्यानंतर पोलिसांना फोन करून...'

Anjali Damania on Gauri Palwe Death Case : 'गौरी आधी ज्या चाळीत राहायची तेथून नवीन टॉवरमध्ये ते शिफ्ट करणार होते. तर पॅकिंगच्या वेळी तिला काही पेपर मिळाले, ज्यामध्ये किरण इंगळे नावाच्या बाईचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा रुग्णालयात नेलं होतं. तेव्हा त्याच्यात तिच्या नवऱ्याचे नाव अनंत गर्जे लिहिलेलं तिला दिसलं.
Anjali Damania on Gauri Palwe’s Death case
Dr. Gauri Palwe’s Death case sparked major controversy as activist Anjali Damania raised questions about police action and political involvement in the incident.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 23 Nov : भाजपच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांचे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर देखील नाराजी दर्शवली आहे.

त्या म्हणाल्या, 'मला दु:ख होतंय कारण या घटनेबाबत पंकजा मुंडेंना रात्री या घटनेबाबत समजलं असेल, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा, असं देखील सांगितलेलं नाही.'

शिवाय यावेळी मुंडेंनी पोलिसांना फोन करून तो माझा पीए असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे. शिवाय त्यांनी फोन करून तसं म्हणावं अशी मी विनंती करते, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.

Anjali Damania on Gauri Palwe’s Death case
Gauri Palwe Death Case : 'आमची मुलगी लढाऊ, तिला खूप टॉर्चर केलं; पंकजाताईंचा संबंध नाही पण तो माणूस...'; गौरी पालवेच्या मामांचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाची त्यांनी सविस्तर माहिती दिली. गौरी एवढी स्ट्राँग मुलगी होती, त्यामुळे तिने आत्महत्या केली असं वाटत नाही. पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर होण्यास थोडा वेळ लागला. कारण आधी एका जबाबात तिने आत्महत्या केल्याचं लिहिलं होते.

Anjali Damania on Gauri Palwe’s Death case
Anant Garje Case Filed : अनैतिक संबध, गर्भपात अन्..., पंकजा मुंडेंचा पीए अनंतवर गुन्हा दाखल; गौरीच्या वडिलांचा धक्कादायक जबाब

पण तिच्या वडीलांचं म्हणणं होतं की, आत्महत्या केलेय की हत्या हे माहिती नव्हतं. त्यामुळे त्यानंतर मी एसीपींना विनंती केल्यानतंर त्यांनी एफआयआरमध्ये दुरूस्ती केली. आताच्या एफआयआरमध्ये आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचं लिहिलं आहे.

मात्र, पुढे पोस्टमार्टमनंतर घातपात झाल्याचं कळताच ताबडतोब ३०२ चा गुन्हा दाखल करू, असे पोलिसांनी आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या तीन जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये गौरीचा नवरा अनंत गर्जे, नणंद शितल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिलं.

दरम्यान, गौरी आधी ज्या चाळीत राहायची तेथून नवीन टॉवरमध्ये ते शिफ्ट करणार होते. तर पॅकिंगच्या वेळी तिला काही पेपर मिळाले, ज्यामध्ये किरण इंगळे नावाच्या बाईचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा रुग्णालयात नेलं होतं. तेव्हा त्याच्यात तिच्या नवऱ्याचे नाव अनंत गर्जे लिहिलेलं तिला दिसल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद वाढल्याचं गौरीच्या आई-वडिलांनी आपल्याला माहिती दिल्याचं दमानियांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com