Gautam Adani Meet Sharad Pawar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता शरद पवारांच्या भेटीला गौतम अदानी दाखल!

Gautam Adani Meet Sharad Pawar : एका तासात राज्यात दोन मोठ्या भेटी..
Gautam Adani Meet Sharad Pawar
Gautam Adani Meet Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानावर भेट घेतली होती. यानंतर आता एक तासाच्या कालावधीत शरद पवार यांच्या घरी देशातील मोठे उद्योजक गौतम अदानी दाखल झाले आहेत.

यामुळे आता शरद पवार यांच्या यो दोन भेटींबाबत आता एकच चर्चा होत आहे. (Gautam Adani Meets Sharad Pawar: After the meeting with the Chief Minister eknath Shinde)

Gautam Adani Meet Sharad Pawar
Bacchu Kadu News : शिंदे-फडणवीसांच्या म्हणण्यावरून तेव्हा शांत झाले, पण बच्चू कडू - रवी राणा पुन्हा भिडणार?

उद्योगपती गौतम अदानी हे शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहचले आहेत. शरद पवार आणि अदानी यांचे चांगले संबंध आहेत. अदानी हे नेहमी पवारांनी भेटत असतात. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर लगोलग अदानींची भेट होणे, याला राजकीय दृष्टीन पाहिले जात आहे.

मुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट :

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीआधी पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली होती.मराठा मंदिर संस्थेला यंदाच्या वर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी यावे, यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येते.

Gautam Adani Meet Sharad Pawar
Shiva Rajyabhishek News : रायगडावर उद्या होणार ३५०वा शिवराज्यभिषेक वर्ष सोहळा...

यावर भाजप नेते व मत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, 'शरद पवार यांनी वेैयक्तिक कारणासाठी मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे यांना भेट घेतली. यातून कसलाही राजकीय अर्थ काढावा, असं काही नाही. त्याची आवश्यकता नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com