Mumbai Police : प्रजासत्ताकदिनी मुंबईतील दोन हजार ९०० जणांना बढतीची भेट

Republic day gift : प्रलंबित बढती प्रक्रिया मार्गी लागल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण
Mumbai Police
Mumbai PoliceSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Police : गेल्या काही काळापासून या मुंबई पोलीस (Mumbai Police) कर्मचाऱ्यांच्या बढत्या प्रलंबित होत्या. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. आता प्रजासत्ताकदिनी मुंबई पोलीस दलातील दोन हजार ९०० पोलिसांना बढतीची भेट मिळाली आहे. या बढतीमुळे उर्वरीत कर्मचाऱ्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मुंबई पोलीस दलात दर महिन्याला १२० ते १५० पोलीस निवृत्त होतात. त्यामुळे दरवर्षी १५०० ते १८०० पोलिसांना बढती मिळते. त्यात पोलीस नाईक, पोलीस हवालदार व साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदासाठी कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली आहे.

त्यातील ३२९ पोलीस हवालदारांना सहायक पोलीस फौजदार पदी बढती मिळली आहे. उर्वरित दोन हजार ५९९ पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी बढती मिळाल्याचे मुंबई दलातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Mumbai Police
Thackeray Vs Shinde : शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे दाखल होणार!

कोरोनानंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील पोलीस नाईक, पोलीस हवालदार व साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदासाठी मोठ्या प्रमाणात बढत्या प्रलंबित होत्या. २६ जानेवारीला मुंबई पोलीस दलातील दोन हजार ९०० पोलिसांना पोलीस नाईक, पोलीस हवालदार व साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशा विविध पदावर बढती देण्यात आली आहे.

Mumbai Police
MNS News : "आव्हाड, मुंब्र्याच्या कुठल्या बिळात लपून बसलेत ?" ; 'पठाण' वरुन मनसेचे राष्ट्रवादीवर टीकास्त्र

मुंबई पोलीस दलात सध्या ३७ हजार कर्मचारी आहेत. मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेने हे संख्याबळ खूपच कमी आहे. दरम्यान कोरोनामुळे व इतर कारणांनी दोन वर्षे भरती प्रक्रिया रखडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलासाठी प्रथमच सात हजार पदांसाठी मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यापूर्वी पोलीस दलातील प्रलंबित बढत्या करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेण्यात आला.

प्रजासत्ताकदिनी मिळालेल्या बढतीरुपी भेटमुळे मुंबई पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे इतर बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com