Amey Khopkar News : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan News) 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी या चित्रपटाला देशभरात ठिकठिकाणी विरोध होत आहे.
अनेक ठिकाणी चित्रपटाचे खेळ बंद पाडण्यात आले आहेत. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,कर्नाटक, बंगाल आदी राज्यांतील काही शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर निदर्शने करण्यासह खेळ बंदही पाडण्यात आले आहेत. चित्रपटाची भित्तीपत्रके आणि फलक फाडण्याच्याही घटना घडल्या आहेत.
एकीकडे 'पठाण'ने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत असून दुसरीकडे त्याच्या प्रदर्शनावरून होणार वाद निर्माण झाला आहे. राज्यभरात सर्वच चित्रपटगृहात 'पठाण' चित्रपट प्रदर्शित झाल्याने मराठी चित्रपटांची गळचेपी झाल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यावरुन आता मनसे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात नवा वाद निर्माण होण्याचे चित्र आहे.
पठाण चित्रपटामुळे अनेक ठिकाणी चांगले चालत असलेले 'वेड', वाळवी' सारखे मराठी चित्रपट तसेच, ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ या मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये अत्यंत कमी शो देण्यात आले.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे. खोपकर म्हणाले की, "हर हर महादेव चित्रपटाच्या वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?" अशी घणाघाती टीका केली. खोपकरांनी टि्वट करीत आव्हाडांवर निशाणा साधला आहे.
'हर हर महादेव' या चित्रपटावरुन जितेंद्र आव्हाडांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाची आठवण खोपकर यांनी करुन दिली आहे.
"आज 'पठाण' हा चित्रपट बॉलिवूडसाठी मोठी घटना वगैरे आहे. पण शाहरुख खानचा कमबॅक आहे, म्हणून मल्टीप्लेक्सनी ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ या चित्रपटांचा बळी का द्यावा?" असा सवाल अमेय खोपकर यांनी विचारला आहे.
"पठाणचं भलं करा, पण मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा द्यायलाच हवा. मल्टीप्लेक्स चालकांनी समंजसपणे वागावे, नाहीतर मग आम्ही येऊन ‘बांबू’ लावूच शकतो," असा सज्जड दम खोपकरांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.