MLA Disqualification In Maharashtra :
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे आणि सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाचे 40 आमदार अपात्र होणार! अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे Girish Mahajan यांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरून विधानसभाध्यक्ष गिरीश महाजन हे उद्या निकाल देणार आहेत. निकालाच्या काही तास आधीच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक वक्तव्य केले आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले तरी काही फरक पडत नाही, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना 40 हून अधिक आमदार बाहेर आले. तेवढेच आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे आहेत. एकूण एकच स्थिती आहे. जर तर असे काही नाही. भाजपकडे 116 आमदार आहेत. पुन्हा 40 ते 42 आमदार अजितदादांकडे आहेत आणि तेवढेच शिवसेनेचे आमदार आहेत, अशी आमची महायुतीची संख्या जवळपास 210 च्या जवळपास आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले तरी त्याचा सरकारवर काही फरक पडणार नाही. शिवसेना शिंदे गटाला न्याय मिळेल, अशी आम्हाला आशा आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.